Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
FDA Investigation In Ganeshotsav : गणेशोत्सव काळात अन्न आणि औषध प्रशासन अर्थात FDA कडून खाद्य पदार्थांवर नजर असून घरगुती नैवेद्य तयार करणाऱ्यांवरही लक्ष असणार आहे.

खाद्य नमुन्यांची तपासणी
गणेशोत्सवात मिठाई, खवा, मावा या अन्नपदार्थांना मोठी मागणी असते. त्यामुळे या काळात भेसळ, कमी दर्जाच्या उत्पादनाची बाजारात विक्री होण्याची शक्यता अधिक असते. हे प्रकार रोखण्यासाठी, तसेच ग्राहकांना सुरक्षित आणि सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी संशयित पदार्थाचे नमुने घेतले जात आहेत. प्रत्येक नागरिकास सुरक्षित आणि सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी तपासणी आणि खाद्य नमुने घेण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे.अन्नत्याग आंदोलनामुळे रविकांत तुपकर यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल; थ्रोट इन्फेक्शनसह किडनीवरही परिणाम
मिठाई, अन्न पदार्थ बनवणाऱ्या व्यावसायिकांसाठी सूचना
कच्चे अन्नपदार्थ आणि खवा हे परावानाधारक, नोंदणीधारक अन्न व्यावसायिकांकडून खरेदी करावे, जेणेकरुन आपल्याकडे त्यांची खरेदी बिले राहतील. प्रत्येक अन्न व्यावसायिकाने विक्री बिलावर अन्न सुरक्षा आणि मानदे कायदा २००६ अंतर्गत प्राप्त परवाना, नोंदणी क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे. पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा. अन्नपदार्थ स्वच्छ आणि सुरक्षित ठिकाणी साठवावेत.१००० च्या जागी १६००, तर ५०० रुपयावर निघाले ११००; एटीएमबाहेर नागपूरकरांची एकच गर्दी
कामगारांची त्वचा आणि संसर्गजन्य रोगांपासून मुक्त असल्याबाबतची वैद्यकीय तपासणी करावी. बंगाली मिठाई ८-१० तासांच्या आत खाण्याबाबत पॅकेजिंग मटेरियलवर निर्देश देण्यात यावेत. स्पेशल बर्फीचा वापर मिठाई बनवण्यासाठी करू नये. माश्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जाळीदार झाकणे, बंदिस्त शोकेस असावेत. खाद्य तेल २-३ वेळाच वापरण्यात यावे. त्यानंतर ते बायोडिझेल कंपन्यांना देण्यात यावे. मिठाईच्या घटक पदार्थांचा तपशील मिठाईच्या ट्रे-वर अथवा आस्थापनेच्या दरपत्रकात किंवा आस्थापनेमध्ये दर्शनी भागावर लावावा.
अन्नपदार्थाची कसून चौकशी, घरगुती प्रसाद आणि नैवेद्य तयार करणाऱ्यांवरही ‘एफडीए’ची करडी नजर
नैवेद्याचे पदार्थ तयार करणाऱ्यांनाही निर्देश
नैवेद्याचे पदार्थ तयार करणाऱ्यांना अगोदरच सूचना करण्यात आल्या आहेत. मोदक, पेढे किंवा दुग्धजन्य पदार्थ रोजच्या रोज करावेत, असे निर्दश देण्यात आले आहेत. तरीही नागरिकांना पदार्थांमध्ये संशय आढळल्यास कार्यालयाशी संपर्क साधावा, अशी माहिती अन्न-औषध प्रशासन, सहायक आयुक्त, विवेक पाटील यांनी दिली आहे.