Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला स्त्री २, पहिल्या नंबरसाठी या सिनेमांशी स्पर्धा

9

Stree 2 Box Office Collection: ‘स्त्री २’ ने २४ व्या दिवशी मजबूत कमाई केली. आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांच्या यादीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर ‘जवान’, ‘पठाण’ आणि ‘गदर २’ चा नंबर लागतो. ‘स्त्री २’ चे किती कलेक्शन झाले.

हायलाइट्स:

  • ‘स्त्री २’ ने २४ व्या दिवशी मोठी कमाई केली आहे.
  • ‘स्त्री २’ हा आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चौथा हिंदी चित्रपट ठरला आहे.
  • ‘स्त्री २’ ने २४ दिवसांत किती कलेक्शन झाले ते जाणून घेऊ.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई- राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा ‘स्त्री २’ ने बॉक्स ऑफिसवर यशस्वी २४ दिवस पूर्ण केले आहेत. तरीही या सिनेमाची क्रेझ काही कमी झालेली नाही. केवळ ५० कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने ५०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आता २४ व्या दिवशीही सिनेमाने मोठा विक्रम केला आहे. ‘स्त्री २’ आता चौथा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट ठरला आहे. ‘स्त्री २’ भविष्यात इतकी बंपर कमाई करेल आणि इतर बिग बजेट चित्रपटांना मागे टाकेल याची कोणाला कल्पनाही नव्हती. ‘स्त्री २’ रिलीज होऊन लवकरच १ महिना पूर्ण होईल. तरीही तो अजून कोट्यवधी रुपयांची कमाई करत आहे. अलीकडच्या काळात अनेक बिग बजेट चित्रपट रिलीज झाले. पण ते बॉक्स ऑफिसवर आठवडाभरही टिकू शकले नाहीत. ‘स्त्री २’ ची कमाई २४ व्या दिवशी ८८% ने वाढली.. Sacnilk अहवालानुसार, ‘स्त्री २’ ने २४ व्या दिवशी कमाईत ८८% वाढ करत ८.५ कोटी रुपये कमावले. २३ व्या दिवशी सिनेमाने ४.५ कोटींची कमाई केली होता. आता देशभरातील चित्रपटाचे एकूण कलेक्शन ५१६.२५ कोटींवर पोहोचले आहे.

आईबाबा झाले दीपवीर! गणेशोत्सवात दीपिका पादुकोणच्या घरी गौराईचं आगमन
‘स्त्री २’ ‘जवान’पेक्षा फक्त ५० कोटी दूर

‘स्त्री २’ आता आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. शाहरुख खानचा ‘जवान’ पहिल्या क्रमांकावर, सनी देओलचा ‘गदर २’ दुसऱ्या क्रमांकावर आणि शाहरूखचा ‘पठाण’ तिसऱ्या क्रमांकावर आहे. ‘बॉक्स ऑफिस इंडिया’नुसार, ‘जवान’पर्यंत पोहोचण्यासाठी स्त्री २ ला अजून ५० कोटी रुपयांची गरज आहे. मात्र, चौथ्या आठवड्यापासून एवढा कलेक्शन गोळा करणे ‘स्त्री २’साठी सोपे जाणार नाही. ‘जवान’ हा एकमेव हिंदी चित्रपट आहे ज्याने तिसऱ्या आठवड्यानंतर ५० कोटींची कमाई केली होती.
कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न, गरोदर असतानाचा सासरच्यांनी आशा भोसलेंना काढलेलं घराबाहेर
‘स्त्री २’ ने या चित्रपटांचा पराभव केला

अमर कौशिकच्या ‘स्त्री २’ ने आतापर्यंत ‘पीके’, ‘एनिमल’, ‘बाहुबली’, ‘दंगल’, ‘टायगर झिंदा है’, ‘बजरंगी भाईजान’, ‘संजू’, ‘वॉर’, ‘पद्मावत’, ‘कबीर सिंग’ आणि ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या सिनेमांना मागे टाकले आहे.

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला स्त्री २, पहिल्या नंबरसाठी या सिनेमांशी स्पर्धा

‘स्त्री २’ चे जगभरातील कलेक्शन

देशभरात ‘स्त्री २’ ने ५१६.२५ कोटी रुपये कमावले आहे. जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर २४ दिवसांत ७३७.२५ कोटी रुपये कमावले आहेत. शनिवार, ७ सप्टेंबर रोजी सिनेमाने हिंदीतून २४.२७% कमाई केली होती.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.