Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Ajit Pawar Baramati: विधानसभा निवडणूक बारामतीमधून न लढण्याचे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा दिले आहेत. बारामतीमधील कार्यक्रमात ते बोलत होते.
बारामतीत बोलताना अजित पवारांनी बारामतीमधून निवडणूक न लढण्याचे संकेत पुन्हा एकदा दिले. काम करुनही अशी गंमत होणार असेल तर मग झाकली मूठ सव्वा लाख रुपयांची राहिलेली बरी. मी आता ६५ वर्षांचा झालोय. मी तसा समाधानी आहे. जिथे पिकतं, तिथे विकत नसतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. एकदा काय झालं पाहिजे. कोणीतरी मी सोडून दुसरा आमदार बारामतीला मिळाला पाहिजे. मग तुम्ही १९९१ ते २०२४ पर्यंतच्या माझ्या कामांची तुलना करा, असं म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना भावनिक केलं.
Magadh Express Accident: एक्स्प्रेसला अपघात, धावत्या ट्रेनचे दोन भाग; शेकडो प्रवासी थोडक्यात वाचले, पाहा VIDEO
आज बारामतीत अनेकांच्या पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं अजित पवारांनी मेळावा घेतला. या मेळाव्यात अजित पवारांनी विविध विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, बारामतीकरांच्या नादाला लागायचं काम नाही. बारामतीकरांना शिकवायला जाऊ नका मला उडवून लावलं तर तुमचं काय? मी कुणाची दादागिरी खपवून घेणार नाही. माझ्या जवळचा कार्यकर्ता असला आणि चुकला तर मोक्का लावला. मी मागे पुढे पाहणार नाही, असाही दम अजित पवारांनी दिला.
दरम्यान अजित पवारांनी निवडणुकीचा संदर्भ घेत एक वाक्य वापरले. ते म्हणाले, परवा सुनील तटकरे म्हटलं काय केले हे? त्यावर मी म्हणालो, त्यांनी केलं. सुनील तटकरे म्हणाले, काम केलं. तरी असं कसं होतं? मी म्हणालो, मला नाही माहीत. ते यांना विचारायचं, काम करायचं आपल्या हातात आहे, दाबायचं लोकांच्या हातात.
Pune News: महायुतीत पुन्हा श्रेयवादाला तोंड फुटलं, भाजपने NCP आमदाराच्या नामफलकावर काळं फासलं
पवार साहेबांनी कधी अर्थ खाते स्वतःकडे ठेवलं नाही. त्यांनी मुख्यमंत्रिपदासह अनेक पदं भूषवली. मंत्रिपद माझ्याकडे आल्यानंतर मी अर्थ खातं घेतलं आणि त्यामध्ये निधी कसा आणता येईल याचा विचार केला. अर्थ खात्यावर कुणीतरी काहीतरी बोललं, बोलणाऱ्यांना बोलू द्या तुम्ही त्यात लक्ष घालू नका आम्ही तिकडे बघू, असं अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar: बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळायला हवा, मग तुम्हाला…; दादांकडून कोणते संकेत?
मला अनेक कामं करायची आहेत. करायचं की नाही करायचं, हे तुमच्या हातात आहे. मी पण माणूस आहे. इतकं करूनदेखील मला हे बघावं लागत असेल, जिथे मी दुसऱ्याला खासदार, आमदार करतो तिथे जर अशी परिस्थिती होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची राहिलेली बरी, असं म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना भावनिक केलं.