Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Central Railway Special Local : कोकणात गेलेल्या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वेने विशेष रेल्वेचे आयोजन केले आहे. मडगाव ते पनवेल मार्गावर विशेष गाडी मध्य रेल्वे सोडणार आहे.
रेल्वे धाव रे, कोकण दाव रे… गणरायाच्या भेटीसाठी चाकरमान्यांचा प्रवास कसा असतो, ऑन द स्पॉट रिपोर्ट
गणपती विसर्जनानंतर वाढलेली गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या सहयोगाने गर्दीनुसार विशेष गाड्यांचे नियोजन करण्याचे धोरण स्वीकारले आहे. यानुसार मडगाव ते पनवेल मार्गावर दिनांक १५ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी नऊ वाजून ३० मिनिटांनी विशेष गाडी (०१४२८) सुटेल. पनवेलला ती रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी (०१४२७) पनवेल येथून रात्री अकरा वाजून ४५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता ती मडगावला पोहोचणार आहे.
कोकणात गेलेल्या चाकरमान्यांसाठी मध्ये रेल्वे सोडणार विशेष ट्रेन, पाहा कसे असेल वेळापत्रक
विशेष गाडीचे थांबे
करमाळी, थिवी, सावंतवाडी, झाराप, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, नांदगाव रोड, वैभववाडी रोड, राजापूर, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर, आरवली, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव रोड तसेच पेण हे थांबे देण्यात आले आहेत. गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते कुडाळ या गणपती स्पेशल गाड्याना आरवली रोड तसेच नांदगाव रोड येथे अतिरिक्त थांबे देण्यात आले आहेत.