Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लेकाचा हट्ट, पाटलांच्या घरी गणरायाचं आगमन; पण कुटुंबावर विघ्न, तिहेरी हत्याकांडाचं कारण समोर

7

Raigad Triple Murder Case: लेकानं हट्ट केल्यानं पाटील यांनी घरी पहिल्यांदाच गणपती आणला. पण त्यांच्या कुटुंबावर जीवघेणं संकट आलं. त्यांच्या कुटुंबाचा शेवट झाला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
– अमोल जैन

कर्जत: एकाच कुटुंबातील तीन सदस्यांची हत्या झाल्यानं रायगडमधील कर्जत तालुका हादरला आहे. पती, पत्नी आणि मुलाची निर्घृणपणे हत्या करुन त्यांचे मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आल्याचा प्रकार नेरळमधील चिकनपाडा परिसरात घडला. घरात गणरायाचं आगमन झालेलं असताना पाटील कुटुंबावर जीवघेणं संकट आल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या तिहेरी हत्याकांडाचा उलगडा पोलिसांनी केला आहे. भाऊबंदकीमधील जागेच्या वादातून ही घटना घडल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

कर्जत तालुका आज सकाळी तिहेरी हत्याकांडानं हादरून गेला. सकाळी नऊच्या सुमारास एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना नेरळ पोलीस स्टेशन हद्दीतील चिकनपाडा येथे घडली आहे. मदन जैतू पाटील (३५), त्याची सात महिन्यांची गर्भवती पत्नी अनिशा मदन पाटील (३०), त्यांचा दहा वर्षाचा मुलगा विनायक मदन पाटील यांचा मृतांमध्ये समावेश आहे. घरात गणपतीची प्रतिष्ठापना झालेली असताना मध्यरात्री तिघांचे खून झाल्याने कर्जत तालुका हादरला आहे. सदर हत्याकांड हे भाऊबंदकीमधील जागेच्या वादातून झाल्याचं सांगण्यात येतं.
संतापजनक! विवाहित महिलेवर नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचार, नंतर पतीने केली तरुणीला बेदम मारहाण
वडिलांनी बांधलेल्या घराचा अर्धा भाग आपल्या नावावर करून द्यावा म्हणून मदन यांचा भाऊ हनुमंत वाद घालत होता. मदन पाटील यांच्या घरात प्रथमच गणपती बसवण्यात आला होता. हनुमंतनं त्याच्या पत्नीला माहेरी पाठवलं होतं. सात सप्टेंबरच्या रात्री त्या दोन्ही भावांमध्ये वाद झाल्याचं बोललं जातं. आरोपीनं हत्या करण्याआधी विनायकाच्या गुप्तांगावर लाथ मारली. त्यानंतर त्यानं विनायकाला संपवलं.
Vande Bharat Train : अजबच! वंदे भारत ट्रेन चालवण्यावरून दोन लोको पायलटमध्ये तूफान हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
सकाळी १० वाजता नेरळ कळंब रस्त्यावरील नाल्यात दहा वर्षांच्या विनायक आणि अनिशा मदन पाटील यांचे मृतदेह आढळून आले. तर घरामध्ये मदन जैतू पाटील यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. नेरळ पोलीस हत्याकांडाचा पुढील तपास करत असून हनुमंत जैतू पाटील यास संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. त्याची चौकशी स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि नेरळ पोलिस ठाण्याचे कर्मचारी चौकशी करत आहेत. तिघांचे मृतदेह कर्जत येथील उप जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आले आहेत.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.