Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Vadgaon Sheri Vidhan Sabha : आमदार सुनील टिंगरेंच्या विरोधात माजी आमदार बापू पठारे निवडणूक लढतील अशी शक्यता आहे.
Bapu Pathare : शरद पवारांचा भाजपला पुन्हा दे धक्का, जुना मोहरा हेरला, माजी आमदार ‘तुतारी’ वाजवणार
महायुतीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. युतीत ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यामुळे भाजपकडून तिकिटाच्या आशा मावळल्या. त्यामुळे टिंगरेंच्या विरोधात माजी आमदार बापू पठारे निवडणूक लढतील अशी शक्यता आहे.
पुण्यातील गणपती मंडळांना भेटीगाठी देत असताना पहिल्याच दिवशी बापू पठारे यांनी आपण तुतारीवर निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. आपल्याला मतदान करण्याचं आवाहनही यावेळी पठारेंनी केलं.
Ajit Pawar on CM Face : पुढचा मुख्यमंत्री कुणाचा हे ठरलंय, अजितदादा स्पष्टच बोलले, चेहरा ठरवणं ही आमची…
कोण आहेत बापू पठारे?
सध्या बापू पठारे भाजपमध्ये आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकांच्या आधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी नगरसेवक आणि महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष पद भूषवले आहे. २००९ मध्ये वडगाव शेरी मतदारसंघातून ते विजयी झाले होते. मात्र २०१४ साली भाजपच्या जगदीश मुळीक यांनी पठारेंचा पराभव केला होता
Bapu Pathare : शरद पवारांचा भाजपला पुन्हा दे धक्का, जुना मोहरा हेरला, माजी आमदार ‘तुतारी’ वाजवणार
गेल्या काही दिवसांपासून बापू पठारे भाजपला रामराम करत ‘तुतारी’ हाती घेतील, अशी चर्चा होती. मात्र आता त्यांनीच क्लिअर केलं आहे. वडगाव शेरी मतदारसंघामध्ये पठारे तुतारी हातात घेत असल्याने आगामी निवडणुकीमध्ये मोठी रंगत पाहायला मिळणार आहे.
BJP Mission for Vidhan Sabha: भाजपने ‘निम्म्याहून जास्त’ जागांचा हट्ट सोडला, विधानसभेला नवे मिशन, खात्री फक्त ५० चीच
दुसरीकडे महायुतीमध्येही सारे काही आलबेल नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्याकडून वडगाव शेरी मतदारसंघ भाजपला सोडण्यात यावा अन्यथा दुसऱ्या उमेदवाराचे काम करणार नाही, अशी भूमिका घेतली जात आहे.
वडगाव शेरीचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. त्यामुळे महायुतीतील फॉर्मुल्यानुसार टिंगरेना संधी मिळणार की भाजप वडगाव शेरी आपल्याकडे खेचणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे