Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पश्चिम रेल्वेवर आठवडाभर लोकल खोळंबा, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार फोफावला

9

Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या ठळक बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी

१. पुण्यातील भोसरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी २७ वर्षीय तरुणाला या प्रकरणी ताब्यात घेतले आहे. दारुच्या नशेत त्याने हा फोन केल्याची माहिती आहे. बातमी वाचा सविस्तर…
२. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने विशेष रणनीती आखली आहे. त्यानुसार राज्यात १२५ जागा जिंकण्याचा निश्चय भाजपने केला आहे. यातील जवळपास ५० जागांवर भाजपला विजयाची खात्री आहे. उर्वरित ७५ जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत ‘मिशन १२५’ला अंतिम स्वरूप दिले जात आहे.

३. पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपला जुना मोहरा हेरला. भाजपचे माजी आमदार बापू पठारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. निवडणूक लढवणार आणि तुतारीवरच लढवणार, असं पठारेंनी जाहीर केलं आहे.

४. ‘राजकारणामुळे घरात फूट पडू देऊ नका,’ या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने टीका केली आहे. ‘अजित पवार यांचे हृदयपरिवर्तन झाले असेल आणि ते इतरांना असे सल्ले देत असतील तर त्यांनी आधी शरद पवार यांचा पक्ष परत करावा,’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आली. तर, ‘अजित पवार उमद्या मनाने चूक स्वीकारत बोलले; परंतु त्याचा वेगळा अर्थ काढून संकुचित मनाने टीका करू नये,’ असे प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आले.

५. दीड दिवसांच्या गणरायाचे विसर्जन करून आज, सोमवारी कामावर निघालेल्या प्रवाशांना पश्चिम रेल्वेच्या वेगमर्यादेचा त्रास सहन करावा लागणार आहे. कांदिवली ते गोरेगावदरम्यान धीम्या मार्गावरील नव्या सहाव्या मार्गिकेची जोडणी पूर्ण झाली असून चर्चगेटकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावर सुरक्षेच्या कारणास्तव वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. यामुळे आठवडाभर लोकल फेऱ्या विलंबाने धावणार आहेत. बातमी वाचा सविस्तर…

६. देशभरात २०२० मध्ये कोविड-१९ व्हायरसने धुमाकूळ घातला होता. या काळात अनेकांना विविध आजारांनी ग्रासलं असल्याचं समोर आलं. त्यापैकीच एक म्हणजे हृदयविकाराच्या झटक्याचं वाढतं प्रमाण. करोना काळानंतर मोठ्या लोकांसह अगदी तिशीतल्या, विशीतल्या तरुणांमध्येही हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण वाढलं असून अनेक तरुणांचा यात अचानक मृत्यू झाला आहे. यादरम्यान आता अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे. एका सात वर्षांच्या चिमुकल्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. इतक्या लहान मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला, या घटनेने सर्वांनाच मोठा धक्का बसला असून चिंता व्यक्त केली जात आहे.

७. गेल्या सव्वा वर्षाहून अधिक काळ धुमसत असलेले मणिपूर अजूनही शांत व्हायला तयार नाही. हिंसाचार थांबलेला वाटतो, तोच नव्याने हल्ले होऊ लागतात आणि हिंसाचाराचे नवीन आवर्तन सुरू होते. ईशान्येकडील या अशांत, संवेदनशील आणि सामरिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाच्या राज्यात गेल्या आठवड्यापासून विविध जमातींत सुरू झालेला हिंसाचार हा नव्या आवर्तनाचा भाग म्हणावा लागेल. आसाम सीमेच्या लगत असलेल्या जिरिबाम जिल्ह्यातील हिंसाचारात शनिवारी सहा जणांचा मृत्यू झाला. मणिपूरमधीलच इंफाळ खोऱ्यातील बिष्णूपूर येथे शुक्रवारी झालेल्या रॉकेट आणि ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून जिरिबाम येथील हल्ला झाला. बातमी वाचा सविस्तर…

८. बाप्पाचे आगमान झाले असून आता सणासुदीच्या दिवसांत दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना प्रचंड दिलासा मिळाला आहे. सोन्याच्या दरांमध्ये तेजीच्या सत्रानंतर आता आज आठवड्याची सुरुवात घसरण नोंदवली गेली आहे. सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत सतत अस्थिरता पाहायला मिळत असताना सणासुदीच्या तोंडावर आता सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होताना पाहायला मिळत आहे. आता व्यापार आठवड्याच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा मौल्यवान धातूच्या किंमतीत घसरण नोंदवली गेली आहे. सोन्याच्या वायदा व्यवहारात आज प्रचंड घसरण झाली तर चांदीचे फ्युचर्सही कमजोर सुरुवातीनंतर मजबुत व्यवहार करत आहेत.

९. इंडियन प्रीमिअर लीग 2025 मध्ये कोणत्या खेळाडूला संघ कायम ठेवणार आहे याबाबत अद्याप स्पष्टता आली नाही. कोणत्या खेळाडूंना कायम केले जाईल आणि कोणाला सोडण्यात येईल, याबाबत काहीही सांगता येत नाही. सर्व फ्रँचायझी कायम ठेवण्याच्या नियमांची वाट पाहत आहेत. मात्र, याआधी अनेक खेळाडूंबाबत अनेक दावे केले जात आहेत. मुंबई इंडियन्स संघातील एक सर्वोत्तम खेळाडू यावेळी आरसीबीचा भाग बनू शकतो आणि त्याला संघाचा कर्णधारही बनवले जाऊ शकते, अशी बातमी आता समोत आली आहे.

१०. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात सुरुवातीला मुक्ता घरच्यांना सांगते की आता आदित्य जसं सांगेल तशी मदत सर्वांनी करायची आणि त्याचा प्रोजेक्ट १५ मिनिटात पूर्ण करायचा. सगळे लगबगीने कामाला लागतात आणि एकत्र प्रोजेक्ट करतात.‌ सावनीला मात्र कशाचीच पडलेली नसते. बाजूला बसून फक्त पाहायचं काम करते. सगळ्यांनी मदत केल्यामुळे आदित्यचा प्रोजेक्ट अगदी १५ मिनिटात पूर्ण होतो. आदित्य खूप खुश असतो तो मुक्ताचे आभार मानतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.