Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Mukhyamantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना मैलाचा दगड, सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेल्या लोकांनी डीद हजाराची किंमत काय कळणार, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं आहे.
आळंदी येथे फ्रुटवाले धर्मशाळेत आयोजित मारोती महाराज कुरेकर यांच्या ९३व्या आणि रामराव महाराज ढोक यांच्या ७० व्या अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या यांच्या हस्ते कुरेकर यांना शांतीब्रह्म आणि ढोक यांना तुलसीदास पुरस्कार प्रदान करण्यात आला; तसेच संतपूजनही करण्यात आले. सार्वजनिक बांधकाममंत्री दादा भुसे, खासदार श्रीरंग बारणे, ‘म्हाडा पुणे’चे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव यांच्यासह विठ्ठल रुक्मिणी देवस्थान पंढरपूर, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान देवस्थान, श्री संत तुकाराम महाराज संस्थान, मुक्ताई देवस्थान आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Ajit Pawar: हृदयपरिवर्तन झालेले पाहून आनंद, अजित पवारांनी पक्ष परत करावा; शरद पवार गटाच्या नेत्याचं आवाहन
‘महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, वारकरी पंथानेच देशाला समाज प्रबोधनाची दिशा दाखवली,’ अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. राज्यात लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांच्या टीकेचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. ‘हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. एका दिवसांत कोणतीही योजना सुरू होत नाही. त्यासाठी खूप तयारी करावी लागते. या योजनेतून महिलांना मिळणाऱ्या पैशांवर बोलले गेले. दीड हजारांत विकत घेता का, लाच देता का, अशी टीका करण्यात आली. मात्र, पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजारांची किंमत काय कळणार,’ असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना काढला. शिंदे यांनी आळंदी येथे श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेऊन पूजा केली.
‘म्हणून एसटी फायद्यात’
‘लाडक्या बहिणीला राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसमधून प्रवासाचे तिकीट पन्नास टक्के सवलतीत उपलब्ध केले. हा निर्णय़ घेताना एसटी तोट्यात येईल, अशी टीका करण्यात आली. प्रत्यक्षात एसटी फायद्यात चालत आहे. अतिवृष्टी, गारपीट, अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना सोळा हजार कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली. शेतकरी सन्मान योजनेतून केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांना पैसे देते. एका रुपयांत पीक विमा देण्यात आला,’असेही मुख्यमंत्री म्हणाले.
Eknath Shinde: पैशात लोळणाऱ्यांना दीड हजाराची किंमत काय कळणार, ‘लाडकी बहीण’वरुन मुख्यमंत्र्यांचा टोला
वारकरी पंथानेच देशाला समाज प्रबोधन आणि सन्मार्गाची दिशा दाखवली. राजकीय अधिष्ठानापेक्षा तुमचे (वारकरी) अधिष्ठान मोठे आहे. वारकरी हा समाज घडविणारा कारखाना आहे.- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री