Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
BJP meeting at Mumbai Airport : अमित शाह यांनी राजकीय चित्र बदलण्यासाठी महाराष्ट्रातील नेत्यांना सूचना दिल्या आहेत.
सर्वेक्षणाने झोप उडवली
नुकत्याच आलेल्या सर्व्हेनुसार महाराष्ट्रात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी यांच्या महायुतीला २८८ पैकी १२३ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडी १५२ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवण्याची शक्यता आहे. अशातच शाहांनी रविवारी (८ सप्टेंबर) रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत बैठक घेतली.
Bapu Pathare : शरद पवारांचा भाजपला पुन्हा दे धक्का, जुना मोहरा हेरला, माजी आमदार ‘तुतारी’ वाजवणार
या बैठकीत विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर विविध शासकीय योजनांबाबत जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात झडलेल्या वादग्रस्त विधानांवरही चर्चा झाली.
Amit Shah at Lalbaugcha Raja : अमित शाह सपत्नीक ‘लालबागचा राजा’ चरणी, विधानसभेची पायाभरणी, एअरपोर्टवर महायुतीची हायव्होल्टेज बैठक
अमित शाहांचे सल्ले
सार्वजनिक स्वरुपात अर्थात उघडपणे महायुतीतील नेत्यांनी एकमेकांवर कुठलीही टीका-टिपणी करणं टाळावं, असा सल्ला अमित शाह यांनी दिला आहे. आपण महायुतीत आहोत. संयम बाळगायला हवा, आपली एकजूट असल्याची प्रतिमा जनतेसमोर निर्माण व्हावी, याची काळजी घेतली पाहिजे. विजयी क्षमता असलेल्या योग्य उमेदवारांची निवड करावी, अशा सूचनाही अमित शाहांनी दिल्या. विरोधकांच्या खोट्या कथनांना अर्थात फेक नॅरेटिव्हला उत्तर देत राहा, असा सल्लाही शाहांनी दिला आहे.
BJP Mission for Vidhan Sabha: भाजपने ‘निम्म्याहून जास्त’ जागांचा हट्ट सोडला, विधानसभेला नवे मिशन, खात्री फक्त ५० चीच
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने विशेष रणनीती आखलीय. त्यानुसार राज्यात १२५ जागा जिंकण्याचा निश्चय भाजपने केलेला आहे. यातील जवळपास ५० जागांवर भाजपला विजयाचा विश्वास आहे. तर उर्वरित ७५ जागा जिंकण्याची जबाबदारी पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर सोपवण्यात आली आहे. अमित शाह यांच्या उपस्थितीत ‘मिशन १२५’ला अंतिम स्वरुप दिले जात आहे.