Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Bacchu Kadu: मुख्यमंत्र्यांनी गणपतीचे दर्शन घेण्यापेक्षा शेतकऱ्यांचे दर्शन घ्यावे, बच्चू कडू कडाडले

10

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 9 Sept 2024, 6:45 pm

marathwada heavy rain : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र गणपती दर्शनामध्ये व्यस्त आहेत. मुख्यमंत्र्यांनी गणपतीचे दर्शन बाजूला ठेवून शेतकऱ्यांचे दर्शन घ्यावे. अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
धनाजी चव्हाण, परभणी : परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती सोबतच नदीकाठच्या गावातील घरे देखील वाहून गेली आहे. सणासुदीच्या काळात उघड्यावर राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र गणपती दर्शनामध्ये व्यस्त आहेत. मुख्यमंत्र्यांनी गणपतीचे दर्शन बाजूला ठेवून शेतकऱ्यांचे दर्शन घ्यावे. अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. तर येणाऱ्या सात दिवसांमध्ये नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत दिली नाही, तर पुन्हा एकदा परभणीमध्ये येऊन प्रचंड असा मोर्चा काढू असा इशारा माजी खासदार छत्रपती संभाजीराजे, माजी खासदार राजू शेट्टी व माजी मंत्री बच्चू कडू यांनी दिला आहे.

शेतकऱ्यांना पीक विमा तातडीने द्यावा

बच्चू कडू यांच्या पाठोपाठ माजी खासदार राजू यांनी देखील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ”परभणी जिल्ह्यासह मराठवाड्यामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली आहे. 2019 ला ज्या पद्धतीने कोल्हापूर जिल्ह्यात शासनाने मदत केली होती. त्याच धर्तीवर परभणी सह मराठवाड्यात मदत करणे अपेक्षित आहे. केवळ शेतकऱ्यांनाच मदत करून भागणार नाही तर ज्यांची घरे वाहून गेली आहेत, ज्यांची गुरे ढोरे वाहून गेली आहेत. त्यांना देखील मदत करणे अपेक्षित आहे. तसेच शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा द्यावा.” असेही माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले.
Maharashtra Politics: वडिलांकडून नदीत फेकण्याची भाषा, लेक शरद पवार गटात जाणार; काकांचा पुतण्याला आणखी एक धक्का!

कृषीमंत्री नाच गाण्यात मशगूल आहेत

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ”शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढवले असताना कृषी मंत्री मात्र नाच गाण्यात मशगूल आहेत. तिकडे परभणी सह मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे होत नाहीत. शेतकऱ्यांना अद्यापही अग्रीम पीक विमा मिळाला नाही. संपूर्ण मराठवाड्यात हाहाकार माजला असताना कृषिमंत्री मात्र कोठे आहेत असा प्रश्न पडला आहे. सध्या कृषी मंत्री धनंजय मुंडे हे परळीमध्ये गणेश उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या नटांचे नाच गाण्यांचे कार्यक्रम ठेवत आहेत. त्यांची ती पुस्तिका पाहिली तर आपल्याला देखील लाज वाटेल. अशा प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम कृषिमंत्री कसे ठेवू शकतात? असा सवालही उपस्थित केला आहे.

दरम्यान, दहा दिवसांपूर्वी परभणी जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस झाला आहे. 24 तासामध्ये तब्बल दोनशे मिलिमीटर पावसाची नोंद प्रत्येक मंडळात झाली आहे. तर जिल्ह्यातील 52 पैकी 50 मंडळात अतिवृष्टी झाली. नद्यांना पूर आला ओढे नाले होऊ लागले असून त्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतीबरोबर नदीकाठच्या घरांचे देखील नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज छत्रपती संभाजी राजे, राजू शेट्टी आणि बच्चू कडू परभणी जिल्हा दौऱ्यावर होते.

अजित भाबड

लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.