Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nagpur Hit And Run News: नागपूरमधील रामदास पेठेत रविवारी मध्यरात्री एका ऑडीने एकामागून एक चार ते पाच वाहनांना धडक दिली. ही ऑडी कार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याची आहे.
अर्जुन हावरे (वय २७ रा. खामला) व रोनित अजय चित्तमवार (वय २७ रा.मनीषनगर), अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. जितेंद्र शिवाजी सोनकांबळे (वय ४५, रा. धंतोली) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला. कार अर्जुन हा चालवित होता,असा दावा पोलिस करीत आहेत. अर्जुन हा अभियंता असून, सरकारी कंत्राटदार आहे. रोनित याचा ट्रान्सफार्मरचा व्यवसाय आहे.
Baramati Assembly Constituency: शरद पवारांकडून अजित पवारांना इशारा; निवडणूक एकतर्फी होणार नाही, बारामतीत १२ दिवस चालणार…
प्राप्त माहितीनुसार, संकेत,अर्जुन व रोनित व अन्य एक युवक मित्र आहेत. रविवारी रात्री चौघेही धरमपेठेतील लाहोरी येथे गेले. तेथे त्यांनी जेवन केले. मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास चौघेही एमएच ४०-सीवाय-४०४० या क्रमांकाच्या ऑडी कारने रामदासपेठकडे आले. यादरम्यान ऑडीने जितेंद्र यांच्या एमएच-३१-ईके-३९३९ या क्रमांकाच्या कारला धडक दिली. तत्पूर्वी ऑडीने एमएच-४९-झेड-८६३७ या क्रमांकाच्या कारला धडक दिली. यात मोपेडस्वार दोन तरुण जखमी झाले.यासह अन्य दोन ते तीन वाहनांनाही ऑडीने धडक देत मानकापूरकडे गेली.
Assembly Election 2024: सर्वांच्या भुवया उंचवल्या; विधानसभेच्या आधी शिंदेच्या सेनेतील दोन कट्टर विरोधक आले एकत्र
मानकापूर चौकात अर्जुन व रोनितला चोप
रामदासपेठेत हैदोस घातल्यानंतर चौघेही ऑडीने कोराडीकडे जायला निघाले. मानकापूर टी पॉइन्ट परिसरात ऑडीने फोक्सवँगनची पोलो कारला धडक दिली. यात कारमध्ये तीन जण होते. पोलो कारमधील तिघांनी ऑडीचा पाठलाग केला. मानकापूर पुलावर ऑडीला अडविले. दरम्यान संकेत व अन्य कारमधून पसार झाले. पोलोतील युवकांनी अर्जुन व रोनितला कारमध्ये डांबून तहसील पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणले. तेथे दोघांना मारहाण केली. माहिती मिळताच तहसील पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी रोनित व अर्जुनची सुटका केली. घटनेची माहिती घेत दोघांना सीताबर्डी पोलिसांच्या स्वाधीन केले.
कुस्तीसोडून राजकारणात प्रवेश करणाऱ्या विनेशचे महावीर फोगाट यांनी कान टोचले, काँग्रेस प्रवेशावर दिली मोठी प्रतिक्रिया
नंबर प्लेट काढली, चालकाची अदला-बदली
अर्जुन व रोनितला ताब्यात घेतल्यानंतर सीताबर्डी पोलिसांनी दोघांची चौकशी केली. सोमवारी सकाळी पोलिसांनी टो करून कार पोलिस ठाण्यात आणली. यावेळी कारच्या दोन्ही नंबर प्लेट या कारच्या आतध्ये होत्या. कारच्या नंबरवरुन ती कोणाच्या मालकीची आहे हे ओळखू येऊ नये यासाठी ,असे करण्यात आल्याची चर्चा आहे. दरम्यान अर्जुन हा कारचालवित असल्याचा दावा करीत आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सीसीटीव्हीची पाहणी करण्यात येते आहे. ताब्यात असलेल्या दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. अहवानानंतरच दोघे दारू पिऊन होते किंवा नाही तसेच कारमध्ये संकेतसोबत अन्य कोण होता ते कुठे कुठे गेले याची माहिती घेण्यासाठी धमरपेठ, रामदासपेठ व मानकापूर परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी करण्यात येत आहे,अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली.