Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Parbhani Crop Damage : मराठवाड्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेती सोबतच नदीकाठच्या गावातील घरे देखील वाहून गेली आहेत. ऐन सणासुदीच्या काळात उघड्यावर राहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अशातच सरकार मात्र प्रश्नांकडे कानाडोळा करत असल्याचा गंभीर आरोप छत्रपती संभाजीराजे यांनी केला आहे.
काय म्हणाले छत्रपती संभाजीराजे?
परभणीसह मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे होत नाहीत. शेतकऱ्यांना अद्यापही पीक विमा मिळाला नाही. संपूर्ण मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजला आहे. असे असताना कृषीमंत्री धनंजय मुंडे कुठे आहेत असा प्रश्न पडला आहे. सध्या कृषी मंत्री धनंजय मुंडे परळीमध्ये गणेश उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या नटांचे नाच गाण्यांचे कार्यक्रम ठेवत आहेत.कार्यक्रमाची पुस्तिका पाहिली तर आपल्याला देखील लाज वाटेल अशी टीका छत्रपती संभाजी राजेंनी केली. अशा प्रकारचे मनोरंजनाचे कार्यक्रम कृषिमंत्री कसे ठेवू शकतात? असा सवालही त्यांनी यावेळी संभाजीराजेंनी उपस्थित केला.
आदित्य ठाकरे, तुम्ही तोंडात चांदीचा चमचा पकडून जन्म घेतला; माझ्यासोबत…; कृषिमंत्री धनंजय मुंडेंचे चॅलेंज
संभाजीराजेंचे गुडघ्याभर पाण्यात उभे राहत मुडेंना प्रत्युत्तर
धनंजय मुंडे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या अतिवृष्टी पाहणी दौऱ्यावर टीका केलीय, पाणी सुकल्यानंतर दौरे सुरू झाले असे विधान मुंडे यांनी केले. यावर छत्रपती संभाजी महाराज यांनी धनंजय मुंडे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. गुडघ्या एवढा पाण्यात उभे राहून संभाजी महाराज यांनी धनंजय मुंडे यांना प्रत्युत्तर दिले. संभाजीराजे म्हणाले, मी छत्रपती घराण्याचा आहे शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचे आदर्श माझ्यावर आहेत. अनेकांना वाटते मी आताच निघालोय, माझा ट्रॅक रेकॉर्ड आधी तपासा, लोकांनी पाहिला आहे, दुष्काळ असो किंवा ओला दुष्काळ अनेकवेळा मी गेलोय. काहीतरी राजकीय बोलायचं आणि विषय भरकटवायचा. तुम्ही काय देणार आहात म्हणाले आहात ते द्या पहिले नंतर बोला..
परळीत सांस्कृतिक कार्यक्रम बोट ठेवायचं छत्रपतीवर! संभाजीराजेंचे कृषीमंत्री मुंडेंना प्रत्युत्तर
परळीत सांस्कृतिक कार्यक्रम ठेवायचे आणि बोट ठेवायचं छत्रपतीवर. पहिले तुम्ही आत्मचिंतन करा, तुम्ही कसले सांस्कृतिक कार्यक्रम घेतले. सांस्कृतिक कार्यक्रमाखाली कसले कार्यक्रम झाले, हे शोभणार आहे का महाराष्ट्राला? याचे उत्तर असेल तर समोरासमोर बोलू.. आधी महाराष्ट्राला सांगा दहा दिवस कसले कार्यक्रम तुम्ही घेतले मग समोरासमोर बोलू.. ज्यावेळी शेतकरी अस्वस्थ आहे अशावेळी असे सांस्कृतिक कार्यक्रम घेणे बाकी सगळे न शोभणारे आहे.