Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

अल्पसंख्यकांची सत्ता संपवा, मतदारसंघात कुणबी उमेदवार निवडून आणा; काँग्रेस खासदारांच्या वक्तव्याने नवा वाद

28

Bramhapuri Assembly Constituency: चंद्रपूर येथे आयोजित कुणबी समाजाच्या महाअधिवेशन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा संपूर्ण राज्यात सुरू आहे. धानोरकर यांनी विधानसभा निवडणुकीत कुणबी उमेदवाराला विजय करा असे आवाहन केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर

विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघात जाऊन अल्पसंख्यकांची सत्ता संपवा. पक्ष न पाहता कुणबी उमेदवार निवडून आणा, असे आवाहन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. या माध्यमातून खासदार धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातील वाद नव्याने चर्चेला आला आहे.

ब्रह्मपुरी शहरात रविवारी कुणबी समाजाचे महाअधिवेशन झाले. यावेळी खासदार धानोरकर बोलत होत्या. व्यासपीठावर आमदार परिणय फुके यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार फुके यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण या मतदारसंघात कुणबी उमेदवार देण्याची मागणी करणार आहोत, असे सांगितले. खासदार धानोरकर यांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा इशारा हा वडेट्टीवार यांच्याकडे असल्याचे सर्वांना कल्पना आहे. ब्रम्हपुरी मतदारसंघात कुणबी मतदारांची संख्या ६० हजार इतकी आहे. या मतदारसंघात भाजपकडून कुणबी उमेदवार देण्याची चर्चा आहे. महाअधिवेशनात परिणय फुके यांनी याबाबतचे वक्तव्य देखील केले आहे.
तुमच्या केसाला सुद्धा धक्का बसला तर मी संपूर्ण नागपूर जिल्हा पेटवून देईन; सुनील केदार यांचे भडकाऊ वक्तव्य

धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातील वाद हा लोकसभा निवडणुकीपासून सुरु आहे. पती खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर प्रतिभा यांनी मतदारसंघावर दावा केला होता. तर वडेट्टीवार यांनी मुलगी शिवानीसाठी दावेदारी केली होती. तेव्हापासून या दोन्ही नेत्यात वाद सुरू आहे.विशेष म्हणजे या वादापासून दोन्ही नेते एका मंचावर अद्याप आले नाहीत.
Hit And Run In Nagpur: बावनकुळे यांचा मुलगा संकेतच्या ‘ऑडी’ने दिली ५ वाहनांना धडक; नंबर प्लेट काढली, चालकाची अदला-बदली

वडेट्टीवार समर्थकांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार

खासदार धानोकर यांच्या आवाहनानंतर वडेट्टीवार यांच्या समर्थकांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या तक्रारीची पटोले कशी दखल घेतात याकडे लक्ष लागले आहे.
Assembly Election 2024: आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे टेन्शन वाढलं; तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील सर्वात मोठी अपडेट

असा आहे ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघ

२००८ मध्ये झालेल्या मतदारसंघ पुर्नरचनेनुसार ब्रम्हपुरी मतदारसंघात चंद्रपूर जिल्ह्यातील सावली आणि सिंदेवाही हे दोन संपूर्ण तालुके आणि ब्रम्हपुरी तालुक्यातील गांगलवाडी, ब्रम्हपुरी ही महसूल मंडळे तसेच ब्रम्हपुरी नगरपालिका क्षेत्राचा समावेश होते. हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो. २००९च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपच्या अतुल देशकर यांनी विजय मिळवला होता.त्यानंतर सलग दोन म्हणजे २०१४ आणि २०१९च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांनी विजय मिळवला आहे.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.