Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मंगळवार १७ सप्टेंबर २०२४, भारतीय सौर २६ भाद्रपद शके १९४६, भाद्रपद शुक्ल चतुर्दशी सकाळी ११-४४ पर्यंत, चंद्रनक्षत्र: शततारका दुपारी १-५३ पर्यंत, चंद्रराशी: कुंभ उत्तररात्री ५-४३ पर्यंत, सूर्यनक्षत्र: उत्तरा फाल्गुनी
शतभिषा नक्षत्र दुपारी १ वाजून ५३ मिनिटांपर्यंत त्यांनतर पूर्वाभाद्रपदा नक्षत्र प्रारंभ, धृतीमान योग सकाळी ७ वाजून ४८ मिनिटांपर्यंत त्यानंतर शूल योग प्रारंभ, वणिज करण सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांपर्यत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र दुसऱ्या दिवशी ५ वाजून ४४ मिनिटांपर्यंत कुंभ राशीत त्यानंतर मीन राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२८
- सूर्यास्त: सायं. ६-३८
- चंद्रोदय : सायं. ६-१६
- चंद्रास्त: पहाटे ५-२३
- पूर्ण भरती: सकाळी ११-१४ पाण्याची उंची ४.५४ मीटर, रात्री ११-३४ पाण्याची उंची ४.३९ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ४-४३ पाण्याची उंची ०.६० मीटर, सायं. ५-२२ पाण्याची उंची ०.८६ मीटर
- सण आणि व्रत : अनंत चतुर्दशी, प्रौष्ठपदी पौर्णिमा, विश्वकर्मा दिन
अनंत चर्तुदशी गणपती विसर्जनाचा शुभ मुहूर्त
- दुपारी ३ वाजून २० मिनिटांपासून ते ४ वाजून ५० मिनिटांपर्यंत
- यंदा १ तास ३० मिनिटांचा शुभ मुहूर्त असणार आहे.
- विसर्जन करण्यापूर्वी पूजेची वेळ – सकाळी ६ ते ११ वाजून ४० मिनिटांपर्यंत
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ३३ मिनिटांपासून ते ५ वाजून २० मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून १८ मिनिटांपासून ते ३ वाजून ७ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री ११ वाजून ५२ मिनिटांपासून ते १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत, गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून २३ मिनिटांपासून ६ वाजून ४७ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ६ वाजून ७ मिनिटांपासून ते ७ वाजून ३९ मिनिटांपर्यत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी तीन ते साडे चार वाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ३४ मिनिटांपासून ते ९ वाजून २३ मिनिटांपर्यंत. पंचक काळ पूर्ण दिवस राहणार आहे.
आजचा उपाय
विष्णु चालीसाचे पठण करा आणि तुळशीचे पूजन करा.
(आचार्य कृष्णदत्त)