Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Delhi CM Oath Ceremony Astrology Prediction : आतिशी मार्लिना घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ! ज्योतिषशास्रानुसार कसा असेल राजकीय कार्यकाळ

11

Delhi CM Oath Ceremony : आज दिल्लीच्या नवीन मुख्यंमत्री संजय सिंह, मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आतिशी मर्लिना यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली आहे. आज त्याचा शपधविधी सोहळा आहे. आतिशी यांच्या कुंडलीवरुन जाणून घेऊया त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ कसा असेल. काय सांगते त्यांची भविष्यवाणी.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

Atishi Marlena Horoscope by Date of Birth :

काही राजकीय घडमोडींमुळे १७ सप्टेंबरला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांच्याकडे त्यांचा राजीनामा सुपूर्द केला. त्यांच्या पक्षाच्या युवा नेत्या आतिशी मर्लिना यांना त्यांनी मुख्यमंत्री पदाची उत्तराधिकारी म्हणून घोषित केले.

दिल्लीच्या अबकारी (दारू) च्या कथित घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली. तब्बल ६ महिन्यांनंतर सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना काही अटींवर जामीन मिळाला. अशावेळी त्यांना मुख्यमंत्रीपदावर राहाणे अवघड झाले. त्यांनी दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि राज्यसभा खासदार संजय सिंह हे केजरीवाल यांटे विश्वासू अधिकारी आहेत. त्यांनी केजरीवालांना तुरुंगातुन सोडवण्यास मदत केली. जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्याची कुंडली

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून २१ सप्टेंबरला दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी आतिशी मर्लिना मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. त्यांच्या कुंडलीनुसार त्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महिलांशी संबंधित प्रश्नांना राज्याच्या राजकारणात केंद्रस्थानी आणतील.

कशी असेल नव्या मुख्यमंत्र्याची पत्रिका

८ जून १९८१ रोजी दिल्लीत जन्मलेल्या आतिशी मर्लिना यांच्या जन्माच्या वेळी चंद्र मघा नक्षत्रात असून केतू सिंह राशीत होता. ज्योतिषशास्त्राच्या मते शपथविधीसाठी शास्त्रातील काही नियम लक्षात घेऊन ही वेळ निवडण्यात आली. जेव्हा चंद्र मेष राशीत असतो आणि मूळ राशीसह त्रिकोणात असतो तेव्हा तो शुभ असतो. चंद्र भरणी नक्षत्रात असतो तेव्हा तो त्यांच्या जन्म नक्षत्रापासून मघापासून दुसऱ्या म्हणजे संपत्ती नक्षत्रात असतो तेव्हा तो शुभ असतो. भरणी नक्षत्र हे ज्वलंत नक्षत्र असून या नक्षत्रात सुरु झालेल्या कामामुळे मोठे वाद निर्माण होतील. आज शनिवार २१ सप्टेंबर रोजी पितृपक्षात मकर लग्नाचा उदय झाल्यानंतर दुपारी ४ वाजून ३० मिनिटांनी शपथविधी सोहळा सुरु होईल.

ज्यावेळी आतिशी मर्लिना दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यावेळी स्त्री कारक ग्रह शुक्र तिच्या शपथग्रहण कुंडलीच्या दहाव्या भावात (कर्म आणि स्थिती) तूळ राशीत असेल आणि त्याच्यासोबत समान अष्टक दृष्टी योग तयार करेल. राज्याच्या राजकारणात महिलांचा सहभाग असणारा आणखी एक स्त्री ग्रह (महिला) संबंधित समस्यांना केंद्रस्थानी ठेवण्यास मदत होईल.

राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाल्याने दिल्लीतील प्रमुख विरोधी पक्ष भाजपची आगामी निवडणुकीत अडचण ठरतील. दिल्लीतील आम आदमी पक्षाचा भ्रष्टाचार, रस्ते आणि स्वच्छतेची खराब व्यवस्था यावर राज्य सरकारला कोंडीत पकडणे हे भाजपचे मुख्य लक्ष असेल.
पण आतिशीच्या शपथविधी कुंडलीत मकर राशीवर पाचव्या घरातील गुरूचे पैलू (शिक्षण) आणि सहाव्या भावात बसलेला अग्नी ग्रह मंगळाचा पैलू (रोग आणि वाद) यावरून राजकारणात चुरस निर्माण होईल. शिक्षण, आरोग्य आणि इतर लोककल्याणासाठी राज्याला लाभदायक योजना पुढे नेण्याची शक्यता आहे.

केजरीवाल यासाठीच निवडली शपथविधीची वेळ

आज २१ सप्टेंबर रोजी चंद्र मेष राशीत भरणी नक्षत्रात असताना आतिशी मर्लिना यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणे हा योगायोग नसून एक ज्योतिषीय प्रयोग आहे. आम आदमी पक्षाची स्थापना २६ नोव्हेंबर २०१२ रोजी दुपारी १२ वाजता झाली.

१६ ऑगस्ट १९६८ रोजी जन्मलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या जन्मपत्रिकेत चंद्र मेष राशीत आहे. अशा परिस्थितीत मेष राशीत जन्मलेल्या अरविंद केजरीवाल यांनी मेष राशीच्या दिवशी आम आदमी पक्षात प्रवेश केल्याचे ज्योतिषीय गणनेतून स्पष्ट झाले आहे. चंद्र मेष राशीत असल्यामुळे त्यांना पक्षाची आणि सरकारची सर्व सूत्रे स्वतःच्या हातात ठेवायची आहेत आणि मुख्यमंत्रीपदाची धुरा त्यांचा विश्वासू युवा नेता आतिशी यांच्याकडे सोपवायची आहे. दिल्ली राज्याची स्थापना कुंडली (१ फेब्रुवारी १९९२ मध्यरात्री) झाली तर तूळ राशीचा उदय होत आहे आणि तिसऱ्या घरात चंद्र आणि शुक्र या स्त्री ग्रहांचा ‘समागम योग’ आहे.

मंगळ आणि राहू या दोन ग्रहांच्या त्रासामुळे महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ आणि काही लैंगिक घोटाळ्यांमुळे पुढील वर्षी फेब्रुवारीच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महिलांची सुरक्षा हा केंद्राचा मुद्दा बनण्याची ज्योतिषशास्त्रीय शक्यता आहे.

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.