Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य, 24 सप्टेंबर 2024: स्टार्टअपचा विचार पुढे ढकला ! बोलताना सजग राहा ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य

8

Numerology Prediction, 24 September 2024 : मंगळवार, 24 सप्टेंबर, मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नसेल. हट्टीपणा करु नका, कामे बिघडतील. मूलांक 2 च्या लोकांनी स्टार्टअपचा विचार पुढे ढकलावा. मूलांक 4 चे मन भटकू शकते, एकग्रता वाढवायला हवी. मूलांक 6 च्या जातकांनी कामात तज्ज्ञाचा सल्ला घ्या. मूलांक 7 असणाऱ्यांनी वादविवादात पडू नये. मूलांक 9 च्या लोकांची दिवसभर धावपळ होणार असून बोलताना सजग राहावे. या संदर्भात अधिक माहिती घेवूया. मूलांक 1 ते 9 साठी आजचा दिवस कसा आहे? तुमचा मूलांक काय सांगतो?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
आजचे अंकभविष्य, 24 सप्टेंबर 2024: स्टार्टअपचा विचार पुढे ढकला ! बोलताना सजग राहा ! जाणून घ्या, अंकशास्त्रानुसार तुमचे राशीभविष्य
Aajche Ankbhavishya 24 September 2024: अंक ज्योतिष शास्त्रानुसार, मूलांक 1,2,4 आणि मूलांक 5 साठी दिवस फारसा चांगला नाही. मूलांक 6, 8 आणि मूलांक 9 साठी दिवस ठिक असेल. आर्थिक लाभ आहे पणम खर्च जास्त होणार आहे. आजच्या दिवसाबद्दल तुमचा मूलांक काय सांगतो? मूलांक 1 ते 9 या क्रमांकाचे कोणते लोक आज भाग्यशाली आहेत ते पाहूया.

मूलांक 1 – हट्टीपणा करु नका, कामे बिघडतील

मूलांक 1 असलेल्यांसाठी आजचा दिवस फारसा ठिक नसेल. मला एखादी गोष्ट हवी किंवा मी म्हणेन तसेच झाले पाहिजे असा हट्ट आज करु नका. त्यामुळे तुमची कामे होणार नाहीत. छोटे मोठे बदल प्रत्येक गोष्टीत होतात त्याचा स्विकार करा. आज तुम्हाला जी काही अडचण आहे, त्याला तुम्ही धैर्याने समोर गेले पाहिजे, अन्यथा संबंध बिघडू शकतात.

मूलांक 2 – स्टार्टअपचा विचार पुढे ढकला

मूलांक 2 असणारे लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय करणाऱ्यांच्या दृष्टीकोनातून चांगला आहे. वडिलोपार्जीत व्यवसाय करणाऱ्यांना आज फायदा होणार आहे. जे स्टार्टअप सुरु करण्याचा विचार करत आहेत त्यांना फारसे यश मिळणार नाही, तो विचार पुढे ढकला. कुटुंबातील काही गोष्टी तणावाचे कारण ठरतील. खर्च आणि मिळकत योग्य पद्धतीने न झाल्याने अडचणींना तोंड द्यावे लागेल.

मूलांक 3 – कौशल्याचा वापर करा, कामाचे कौतुक होईल

मूलांक 3 असणारे जातकांना आजचा दिवस ठिक आहे. कौटुंबिक गोष्टीत जेवढी तुमची गरज आहे तेवढेच बोलायला हवे. तुम्ही अधिक करायला गेलात तर त्याचा गैरअर्थ काढण्यात येईल. तुमच्या कौशल्याचा वापर करा त्यामुळे सगळेजण तुमचे कौतुक करतील. आज तुम्हाला काही नव्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल.

मूलांक 4 – मन भटकू शकते, एकग्रता वाढवा

मूलांक 4 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. तुमचे मन भटकू शकते. तुम्ही कामात एकाग्रता ठेवण्याचा प्रयत्न करा. आज काही लोक तुमच्या विरोधात बोलतील, पण योग्य वेळ येताच तुमचे कौतुक करतील. व्यवसायाच्या बाबतीत दिवस ठिक आहे पण भरपूर काम असेल.

मूलांक 5 – ताणतणाव वाढणार, रागावर नियंत्रण ठेवा

मूलांक 5 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. तुमचा ताणतणाव वाढणार आहे. पत्नीसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे. जर तसे झाले तर तुम्ही शांत राहा आणि तुमचे लक्ष इतर कामात गुंतवा. रागावर कंट्रोल करा कारण तुम्ही काही अपशब्द बोललात तर नात्यात कटूता येवू शकते.आज दुसऱ्या व्यक्तीमुळे केलेल्या दिरंगाईमुळे तुम्हाला ऐकून घ्यावे लागू शकते.

मूलांक 6 – कामात तज्ज्ञाचा सल्ला महत्त्वाचा

मूलांक 6 साठी आजचा दिवस ठिक आहे. गुंतवणूक करत असाल तर कागदपत्र तपासा आणि सगळी माहिती करून घ्या. व्यवसाय वाढ किंवा नोकरी बदलाचा विचार करत असाल तर पुढे ढकला.तुम्हाला कोणतेही काम करताना तज्ज्ञानाच सल्ला घ्यायला हवा. आज सजग आणि सतर्क राहावे लागेल, कारण काही लोक तुमच्या प्रेमात अडथळे आणू शकतात.

मूलांक 7 – वादविवादाची शक्यता आहे.

मूलांक 7 साठी आजचा दिवस फारसा ठिक नाही. जोडीदारासोबत काही वादविवाह होतील. मतभेदामुळे तुमचे नाते कमकुवत होऊ शकते, त्यामुळे संयमाने काम करणे आवश्यक आहे. जुन्या गोष्टी योग्यवेळीच सोडवण्याकडे भर द्या.संपत्तीवरून होणार वाद यावर तोडगा निघू शकतो.

मूलांक 8 – आर्थिक लाभ पण खर्च जास्त होणार

मूलांक 8 साठी दिवस जास्त खर्च होणार आहे. तुम्ही जी काही गुंतवणूक केली होती त्याचा फायदा तुम्हाला मिळेल. तुमची आर्थिक स्थिती जरी चांगली असली तरी खर्च करताना पाकिटावर जोर येणार नाही याची काळजी घ्या. कर्ज घेवू नका किंवा घेतले असेल तर ते वाढवू नका.

मूलांक 9 – दिवसभर धावपळ, बोलताना सजग राहा

मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी आजचा दिवस धावपळीचा आहे. आर्थिक स्थितीत गडबड होण्याची शक्यता आहे. खर्च जास्त होण्याची शक्यता आहे. प्रेमात थोडे खटके उडतील तेव्हा सांभाळू राहा. बोलताना आज सजग राहा. काही गोष्टी आज पराचा कावळा करू शकतात, त्यामुळे आज तुमच्या मनातील गोष्टी जाहीर करू नका.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.