Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Sarva Pitru Amavasya 2024 Date : सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहणाचे सावट! या काळात श्राद्ध विधी करु शकतो का? जाणून घ्या
Sarva Pitru Amavasya 2024 Shradha Vidhi : सर्वपित्री अमावस्या ही भाद्रपद अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी पितरांचे तर्पण आणि श्राद्ध विधी करुन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. तसेच हा दिवस पितृपक्ष पंधरवड्याचा शेवटचा दिवस मानण्यात आला आहे. सर्वपित्री अमावस्या कधी? तिचे महत्त्व आणि श्राद्ध विधीबद्दल जाणून घेऊया सविस्तर
Sarva Pitri Amavasya 2024 Tithi :
सर्वपित्री अमावस्या ही भाद्रपद अमावस्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी पितरांचे तर्पण आणि श्राद्ध विधी करुन त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. तसेच हा दिवस पितृपक्ष पंधरवड्याचा शेवटचा दिवस मानण्यात आला आहे.
सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी वर्षातले शेवटचे सूर्यग्रहण असणार आहे. सर्वपित्री अमावस्येला सर्व पितरांच्या नावाने श्राद्ध केल्याने पितरांचे आत्मे तृप्त होतात आणि पितृदोषापासूनही मुक्ती मिळते. या दिवशी ज्ञात आणि अनोळखी व्यक्ती आणि ज्यांना त्यांची मृत्यूची तारीख आठवत नाही ते या दिवशी त्यांच्या पितरांचे श्राद्ध आणि तर्पण करू शकतात.
अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला सर्वपित्री अमावस्या असे म्हणतात. या दिवशी सर्व पितरांचे श्राद्ध विधी केले जातात. सर्वपित्री अमावस्येला विशेष महत्त्व आहे. सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी ज्यांचे श्राद्ध काही कारणाने चुकले असेल, त्यांचे श्राद्ध या दिवशी करता येते. यंदा सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण आहे. सर्वपित्री अमावस्या कधी? तिचे महत्त्व आणि श्राद्ध विधीबद्दल जाणून घेऊया सविस्तर
सर्वपित्री अमावस्या कधी?
हिंदू पंचांगानुसार अमावस्या तिथी ही १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी सुरु होईल. तर २ ऑक्टोबरला दुपारी २ वाजून १९ मिनिटांनी संपले. अशावेळी उदयतिथीनुसार २ ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या असेल.
सूर्यग्रहण हे १ ऑक्टोबरला रात्री ९ वाजून ४० मिनिटांनी सुरु होईल आणि २ ऑक्टोबरला दुपारी ३ वाजून १७ मिनिटांनी संपेल.
सूर्यग्रहणात श्राद्ध विधी करता येईल का?
सर्वपित्री अमावस्येला होणारे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. तसेच हे सूर्यग्रहण सकाळपर्यंत संपणार आहे. या वेळी सुतक काळ देखील वैध राहणार नाही. त्यामुळे शास्त्रानुसार श्राद्धविधी या काळात करता येतील.
सर्वपित्री अमावस्येचे महत्त्व
सर्वपित्री अमावस्येला शेवटचे श्राद्ध विधी केले जाते. या दिवशी पितरांच्या नावाने श्राद्ध विधी करता येतो. ज्या व्यक्तीला श्राद्धाची तारीख माहित नाही अशा कुटुंबातील सर्व सदस्यांच्या नावाने श्राद्ध घातले जाते. सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध, पिंडदान आणि तर्पण वैगरे केल्याने पितरांचा विशेष आशीर्वाद मिळतो.