Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

साप्ताहिक अंकशास्त्र, 30 सप्टेंबर To 6 ऑक्टोबर 2024 : मूलांक 1 कामात प्रगती, नवीन गोष्टी शिकणार ! मूलांक 9 अडचणींचा सामना, उपाय तयार ठेवा ! मूलांक 1 ते 9 साठी अंकशास्त्रानुसार जाणून घ्या तुमचे राशीभविष्य

18

Weekly Numerology Prediction 30 September – 6 October 2024 : अंक ज्योतिषानुसार मूलांक 1 साठी हा आठवडा ऑफिसमधील कामा संदर्भात उत्तम आहे. तुमची प्रगती होणार आहे मूलांक 2 च्या लोकांना धनलाभाचे योग आहेत. मूलांक 3 साठी कामात उत्साह राहणार आहे. मूलांक 4 चा खर्च जास्त होणार आणि प्रेमसंबंधासाठी काळ सुखद आहे. मूलांक 6 हा आठवडा चांगला असून व्यवसाय आणि नोकरीच्या बाबतीत चांगले योग आहेत. मूलांक 7 चा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होणार तर मूलांक 9 साठी कार्यक्षेत्रात अडचणी असून उपाय तयार ठेवा. तुमचा मूलाकं काय सांगतो? मूलांक 1 ते मूलांक 9 साठी आठवडा कसा असेल ते पाहूया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
साप्ताहिक अंकशास्त्र, 30 सप्टेंबर To 6 ऑक्टोबर 2024 : मूलांक 1 कामात प्रगती, नवीन गोष्टी शिकणार ! मूलांक 9 अडचणींचा सामना, उपाय तयार ठेवा ! मूलांक 1 ते 9 साठी अंकशास्त्रानुसार जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
Weekly Numerology 30 September – 6 October 2024: अंक ज्योतिषानुसार मूलांक 1, 2 सह या मूलांकासाठी हा आठवडा उत्तम आहे. धनसंपत्ती वाढ आणि कामासाठी काळ उत्तम आहे. तुमचे प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होतील. प्रेमसंबंधात काही अडचणी असतील तर संवादाद्वारे त्या पूर्ण करा. मूलांक ४, ८ आणि मूलांक ९ यांनी काळजी घ्या. अडचणी वाढणार आहेत तुम्ही उपाय तयार ठेवा. काही शाब्दिक चकमक उडाली तर संवादाद्वारे सोडविण्याचा प्रयत्न करा. चला तर जाणून घेऊ मूलांक 1 ते मूलांक 9 पैकी कोणत्या मूलांकाचे लोक या आठवड्यात भाग्यशाली ठरतील.

मूलांक 1 (जन्म तारीख १, १०, १९, २८): कामात प्रगती, नवीन गोष्टी शिकणार

हा आठवडा ऑफिसमधील कामा संदर्भात उत्तम आहे. तुमची प्रगती होणार असून आठवड्याच्या सुरुवातीच तुम्हाला कामा संदर्भात चांगली बातमी मिळणार आहे. आथिर्त बाबतीत हा आठवडा चांगला असून बँक बॅलन्स वाढणार आहे. प्रेमसंंबंध चांगले राहणार असून प्रेमात बहार येईल तसेच बाहेर फिरायला जाणार आहात. तुम्ही या आठवड्यात काही नवीन शिकणार आहात ज्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल.

मूलांक 2 (जन्म तारीख २, ११, २०, २९): धनलाभाचे योग, प्रेमसंबंधात बहार

कार्यक्षेत्रात उन्नती असून नवीन प्रोजेक्ट मिळणार आहेत. आर्थिक स्थिती मजबूत असून धनलाभाचे योग आहेत, त्याचा लाभ घ्या. संपत्ती संदर्भात काही वादविवाद सुरु असतील तर त्यावर तोडगा निघेल. प्रेमसंबंधात जिव्हाळा वाढेल आणि तुम्ही जोडीदारासोबत भरपूर खरेदी करणार आहात. आठवड्याच्या अखेरीस सुंदर भविष्याच्या दृष्टीने काही ठोस निर्णय घ्याल. तुम्हाला काही टेन्शन असतील तर ते कमी होतील.

मूलांक 3 (जन्म तारीख ३, १२, २१, ३०): धनसंपत्ती वाढणार, कामात उत्साह

हा आठवडा आर्थिक बाबतीत अतिशय उत्तम आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच धनलाभाचे योग आहेत. व्यवसायात नवे प्रोजेक्ट येणार आहेत त्यामुळे लाभ होईल फक्त कामात नियोजन ठेवा. प्रेमजीवनात संबंध दृढ होतील. ज्येष्ठांच्या आशीर्वादाने जीवनात सुखद अनुभव येतील. कार्यक्षेत्रातील उदासिनता कमी होईल. आठवड्याच्या अखेरीस संतुलन ठेवत वाटचाल करा म्हणजे चांगले परिणाम मिळतील.

मूलांक 4 (जन्म तारीख ४, १३, २२, ३१): खर्च जास्त होणार, प्रेमसंबंधासाठी काळ सुखद

हा आठवडा चांगला असून कार्यक्षेत्रात प्रगती होईलय. आठवड्याच्या सुरुवातीलाच नवीन प्रोजेक्ट मिळणार आहे त्याबद्दल तुम्ही थोडी शंका घ्याल. प्रेमसंबंधासाठी वेळ चांगली आहे. आर्थिक बाबतीत वेळ फारशी चांगली नाही तुमचा खर्च जास्त होणार आहे. गुंतवणूक करणे थोडे पुढे ढकला. पैशाशी संबंधित प्रवास तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येईल. आठवड्याच्या अखेरीस एखादी सुखद बातमी मिळू शकते.

मूलांक 5 (जन्म तारीख ५, १४, २३): मेहनतीचे फळ मिळेल, कामे मार्गी लागतील

हा आठवडा तुमच्यसाठी उत्तम असून कार्यक्षेत्रात तुमची प्रगती होणार आहे. तुम्ही कामात अधिक फोकस राहाल तर कामे पटापट मार्गी लागतील. आर्थिक बाबतीत स्थिती उत्तम असून जीवनात सुखद क्षण येणार आहेत. जे खरेदी करण्यासाठी तुम्ही दिवस रात्र एक केली होती ती वस्तू तुम्ही खरेदी करु शकणार आहात. प्रेमसंबंधात मन उदास राहील, आणि कोणत्या ना कोणत्या विषयाने मनाला चिंता राहील. आठवड्याच्या अखेरीस संवादातून प्रश्न सोडवणे योग्य ठरणार आहे.

मूलांक 6 (जन्म तारीख ६, १५, २४): नोकरी, व्यवसायात शुभ योग

हा आठवडा चांगला असून व्यवसाय आणि नोकरीच्या बाबतीत चांगले योग आहेत. काम भरपूर येणार आहे तुम्ही तयार राहा. मेहनत जास्त आहे पण लाभ मोठा होणार आहे. ऑफिसमध्ये सकारात्मक वातावरण असेल. प्रेमसंबंधात थोडा तणाव असेल पण संवादातून तुम्ही प्रश्न सोडवू शकता. आठवड्याच्या शेवटी सगळेकाही ठिक होईल. खर्च वाढण्याची फार जास्त शक्यता दिसत आहे. तुम्हाला गुंतवणुकीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

मूलांक 7 (जन्म तारीख ७, १६, २५): कामावर कंट्रोल, प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होणार

आठवडा चांगला आहे तुम्ही कामावर कंट्रोल करु शकणार आहात. जसेच सहकाऱ्यांची चांगली मदत मिळणार आहे. प्रोजेक्ट वेळेवर पूर्ण होईल फक्त जास्त टेन्शन घेवू नका. आठवड्याच्या अखेरीस काही नवीन सुरुवात होणार आहे त्यासाठी तयार राहा आणि सकारात्मकपणे गोष्टींचा स्विकार करा. आर्थिक बाबतीत स्थिती थोडी डळमळीत राहील पण काळजी करु नका मित्र मदत करतील.

मूलांक 8 (जन्म तारीख ८, १७, २६): कठोर मेहनत तरच फळ मिळणार

ऑफिसच्या कामात यश मिळेल. तुम्ही गेल्या काही दिवसांपासून खूप मेहनत करत आहात पण या आठवड्यात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही जो काही विचार केला आहे तो पूर्ण होणार आहे. तुमचा संघर्ष या आठवड्यात थोडा कमी होईल. आर्थिक स्थिती उत्तम असून धनलाभाचे योग आहेत. गुंतवणूक करताना थोडे सावध राहा.कोणासोबत शाब्दिक चकमक उडाली असेल तर संवादाद्वारे गोष्टी मार्गी लावू शकता.

मूलांक 9 (जन्म तारीख ९, १८, २७): कार्यक्षेत्रात अडचणी, उपाय तयार ठेवा

आठवडा चांगला आहे पण संयमाने पुढे जावे लागणार आहे. कार्यक्षेत्रात काही अडचणी आहेत पण तुम्ही बचावात्मक उपाय आधीच तयार ठेवा तर तुम्हाला लाभ होईल. आर्थिक अडचण जाणवेल, खर्च जास्त होणार आहे तुम्ही काळजी घ्या. प्रेमसंबंधात थोडे भांडण होण्याची शक्यता आहे काळजी घ्या. जीवनात तुम्हाला काही बंधने जाणवतील. आठवड्याच्या अखेरीस सेलब्रेशनचे शुभ संयोग बनत आहेत, आणि मन प्रसन्न होईल.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.