Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पहिल्या तीन दिवसांत बक्कळ कमाई, चौथ्या दिवशी कमाईत घट? ‘धर्मवीर २’नं आतापर्यंत किती कोटींचा गल्ला जमवला?
Dharmaveer 2 box office collection: धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट दोन वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भाग ‘धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ नावानं प्रेक्षकांच्या भेटीला आलाय.
नोकरीच्या शोधात असताना महाराष्ट्रीय हॉटेलमध्ये जेवायचे अमिताभ बच्चन, तिथला हा गोड पदार्थ आजही आहे आवडीचा
वीकएंडपर्यंत या चित्रपटानं तब्बल सात कोटी ९५ लाखांच्या जवळपास कमाई करून दमदार कामगिरी केली आहे. १५०० पेक्षाही अधिक शोजनं या चित्रपटाची सुरुवात करण्यात आली.
‘धर्मवीर’ या चित्रपटानंतर ‘धर्मवीर २’ या चित्रपटात नक्की काय दाखवलं जाणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. त्याचं प्रतिबिंब चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर मिळालेल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादातून दिसून येत आहे.
पहिल्या तीन दिवसांत बक्कळ कमाई, चौथ्या दिवशी कमाईत घट? ‘धर्मवीर २’नं आतापर्यंत किती कोटींचा गल्ला जमवला?
‘धर्मवीर २’ची घोषणा झाल्यापासूनच चित्रपटाविषयी उत्सुकता होती; त्यामुळंच ‘धर्मवीर’ या पहिल्या भागापेक्षा ‘धर्मवीर २’ या चित्रपटाला रसिकप्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभत असलेला ‘धर्मवीर २’ हा पहिला राजकीय सीक्वेल ठरला आहे.
गोविंदा यांच्या पायाला गोळी लागली, लायसन्स रिव्हॉल्व्हर घेऊन सकाळी काय करत होते अभिनेते? मॅनेजरने दिली माहिती
sacnilk च्या आकड्यांनुसार पहिल्या दिवशी चित्रपटानं १.७५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत मोठी वाढ झाली. सिनेमानं २.३५ कोटींचा गल्ला जमवला. तर तिसऱ्या दिवशी सिनेमानं २.७५ कोटींची कमाई केली. तर सोमवारी म्हणजेच चौथ्या दिवशी सिनेमाच्या कमाईत घट झाल्याचं पाहायला मिळालं. सिनेमानं १.१० कोटींची कमाई केली. या सिनेमानं आतापर्यंत सात कोटी ९५ लाखांच्या जवळपास कमाई केली आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटाला महिलावर्गाचा प्रतिसाद मोठा मिळताना दिसतोय. केवळ मुंबई, ठाणे, पालघर नाही, तर पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा असा संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येत्या काही दिवसांत चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.