Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक करणाऱ्या ‘धर्मवीर २’ चित्रपटाची जादू ओसरली? सहाव्या दिवशी काही लाखांमध्ये केली कमाई
Dharmaveer 2 box office collection day 6: दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधल्या लोकप्रिय कलाकारांचा समावेश असणाऱ्या ‘देवरा पार्ट १’सारख्या चित्रपटाला धर्मवीर १ चित्रपटानं जोरदार टक्कर दिल्याचं बॉक्स ऑफिसवर दिसून आलं होतं. पण आता सिनेमाच्या कमाईत घट झाल्याचं दिसून येत आहे.
सचिन पप्पांनी किडनॅपिंगचे केलेले आरोप खोटे… पिळगांवकरांच्या दत्तक मुलीने दिलं होतं सडेतोड उत्तर
पहिल्या दिवशी धर्मवीर २नं १.७५ कोटींचा गल्ला जमवला होता तर. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चित्रपटानं २.३५ , २.७५ कोटींची मोठी कमाई केली होती. त्यानंतर या चौथ्या दिवशी ही कमाई घटल्याचं दिसून आलं. चौथ्या दिवशी चित्रपटानं १.१५ कोटी कमावले. तर पाचव्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन हे १.१९ कोटी होतं. तर सहाव्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. सिनेमानं ६२ लाखांच्या घरात कमाई केल्याचं sacnilk चे आकडे सांगत आहे. असं असलं तरी अद्याप सहाव्या दिवशीचे अधिकृत आकडे समोर आले नाहीयेत. बुधवारी सुट्टी असल्यानं सिनेमाचे आकडे वाढण्याची शक्यता आहे.
पहिल्या दिवशी रेकॉर्डब्रेक करणाऱ्या ‘धर्मवीर २’ चित्रपटाची जादू ओसरली? सहाव्या दिवशी काही लाखांमध्ये केली कमाई
काय आहे सिनेमाचं कथानक?
आनंद दिघे यांच्या आयुष्यावर सिनेमा असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी यात एकनाथ शिंदे यांच्यावरही भर देण्यात आला आहे. धर्मवीर आनंद दिघे आणि त्यांचे शिष्य एकनाथ शिंदे यांच्यातल्या नात्यासोबतच चित्रपटात ‘हिंदुत्वा’वर प्रकाश टाकण्यात आलाय. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ सिनेमात जसे महाराज दिसत असतात, ‘लगे रहो मुन्ना भाई’मध्ये जसे महात्मा गांधी दिसतात, तसंच या चित्रपटात एकनाथ शिंदे यांना वेळोवेळी आनंद दिघे दिसतात, असं दाखवण्यात आलं आहे. तर गेल्या तीन चार वर्षात घडलेल्या सत्तासंघर्षही यात पाहायला मिळतोय.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गायिकेचा अनोखा सांगीतिक प्रयोग! पहिल्यांदाच घडतंय असं काही
‘धर्मवीर २’ या सिनेमाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे उमेश कुमार बन्सल आणि मंगेश देसाई यांनी केली आहे. तर लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी सांभाळली आहे. अभिनेता प्रसाद ओक, क्षितीश दाते यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत