Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Shadriya Navratri 2024 : अंबाबाईच्या नावानं चांगभल…! महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे, वाचा महती

12

Maharashtratil Sadetin Shakti Peeth In Marathi : शारदीय नवरात्री ही भारतात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाते. सध्या सर्वत्र आपल्या भक्तीमय वातावरणा पाहायला मिळत आहे. नवदुर्गेच्या अनेक रुपाबद्दल आपल्याला माहित आहे. परंतु, महाराष्ट्रातील महत्त्वाची साडेतीन शक्तीपीठे कुठे आहेत, त्यांची महती काय जाणून घेऊया. एकूण ५१ शक्तिपीठे भारतात आहेत. जाणून घेऊया पौराणिक मान्यता आणि देवीच्या महतीविषयी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
Shadriya Navratri 2024 : अंबाबाईच्या नावानं चांगभल…! महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठे, वाचा महती
Maharashtratil Sadetin Shakti Peeth :
शारदीय नवरात्री ही भारतात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाते. सध्या सर्वत्र आपल्या भक्तीमय वातावरणा पाहायला मिळत आहे. नवदुर्गेच्या अनेक रुपाबद्दल आपल्याला माहित आहे. परंतु, महाराष्ट्रातील महत्त्वाची साडेतीन शक्तीपीठे कुठे आहेत, त्यांची महती काय जाणून घेऊया.
महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. साडेतीन शक्तिपीठे म्हणजे ॐ काराचे सगुण रूप आहे. ॐ कारामध्ये सार्धत्रय (साडेतीन) मात्रा आहेत. ‘अ’कार पीठ माहूर ‘उ’कार पीठ तुळजापूर ‘म’कार पीठ कोल्हापूर आणि ऊर्धमात्रा सप्तशृंगी. सप्तश्रुंग निवासिनी देवीच्या मूळ ठिकाणाचे दर्शन सर्वांना होत नाही म्हणून अर्धपीठ. आदिशक्तीची काश्मीर, कांची व कामाख्या अशी तीन पीठे आहेत. त्यांना शक्तिपूजेची तीन मुख्य केंद्रे मानली जातात. या प्रमुख तीन पीठांचा वा शक्तिकेंद्रांचा ज्यात समावेश केला जातो, अशी एकूण ५१ शक्तिपीठे भारतात आहेत. जाणून घेऊया पौराणिक मान्यता आणि देवीच्या महतीविषयी

कोल्हापूरची महालक्ष्मी

कोल्हापूरची अंबाबाई अर्थात महालक्ष्मीचे मंदिर हे पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी आणि महाराष्ट्रात असलेल्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. हे मंदिर शिलाहारापूर्वी करहारक (कर्‍हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे अशी माहिती सांगण्यात येते. सातव्या शतकातील चालुक्य राजवटीत राजा कर्णदेव याने हे मंदिक बांधल्याचा उल्लेख काही ठिकाणी आढळून येतो. श्री महालक्ष्मीची ही मूर्ती दगडी चौथऱ्यावर उभी आहे. मंदिरात घाटी दरवाजा, गरूड मंडप अशी सुंदर नक्षीकाम केलेली ठिकाणे आहेत. गरूड मंडप, सभा मंडप १८४४ ते १८६७ च्या दरम्यान बांधण्यात आला. अश्विन नवरात्रात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथर्‍यावर ठेवून तिची पूजा करतात.

रेणुकादेवी

साडेतीन शक्तीपीठांपैकी दुसरे शक्तीपीठ माहूरची रेणुकादेवी. रेणुकादेवी तसेच दत्तात्रेय आणि परशुराम यांचीदेखील प्राचीन मंदिरे माहूरगडावर आहेत. साडेतीन शक्तिपीठांपैकी हे एक मूळ जागृत पीठ होय. परशुरामांची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेकांची कुलस्वामिनी आहे. हे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरच्या गडापासून जवळच ‘रामगड’ हा किल्ला असून, काही कोरीव कामे केलेल्या गुहा आहेत. हे स्थान नांदेड जिल्ह्यात, माहूर तालुक्यात आहे. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे. तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते. परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ‘मातापूर’ म्हणू लागले. शेजारच्या आंध्रप्रदेशात ‘ऊर’ म्हणजे गाव ते ‘ माऊर ‘ आणि पुढे ‘ माहूर ‘ झाले.

तुळजाभवानी

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तर काहींच्या मते हे १७ व्या किंवा १८ व्या शतकातील मंदिर आहे. संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. या ठिकांणी अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक येतात. मंदिराच्या परिसरातील कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर, श्री भवानी शंकर मंदिर, होमकुंड, प्रांगणातील देवीदेवता, मातंगी मंदिर इ. धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत. नवरात्रीचा उत्सव जरी नऊ दिवसांचा असला तरी तुळजापूरला हा उत्सव एकूण एकवीस दिवस चालतो.

​सप्तशृंगी देवी

साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे आणि महत्त्वाचे शक्तीपीठ म्हणजे सप्तश्रृंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले होते. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. देवीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे. या ठिकाणी नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते. श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर आहेत. या शक्तिपीठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक, साक्षात ब्रम्ह स्वरूपिणी धर्मपीठ, ओंकार स्वरूप अधिष्ठान म्हणजे सप्तशृंगगडावरील श्री सप्तशृंगी देवी होय. सप्तशृंगीदेवीबरोबरच गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबुलतीर्थ, मार्कण्डेय ऋषींचा मठ, शितकडा आदी महत्त्वाची, पवित्र तीर्थस्थळे आहेत.

कोमल दामुद्रे

लेखकाबद्दलकोमल दामुद्रेकोमल दामुद्रे मागच्या साडेचार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये लिखाण करत आहे. लाईफस्टाइल, टेक, ऑटो, धार्मिक, प्रवास आणि बिझनेस क्षेत्रातील विविध विषयांवर लिखाण. मागच्या दोन वर्षांपासून धार्मिक विषयांवर लिखाण करत आहे. कालनिर्णयमध्ये संपादकीय सहाय्यक. कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक, कालनिर्णय मुख्य एडिशन, कालनिर्णय आरोग्य व कालनिर्णय स्वादिष्ट यावर काम करण्याचा अनुभव. यापूर्वी कोमलने २०१९ मधील लोकसभा निवडणुकांसाठी पीआर म्हणून काम केले. कोमल ला कामाव्यतिरिक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून कविता आणि लेख लिहायला आवडतात. नवीन पुस्तके आणि धार्मिक गोष्टी वाचण्यात अधिक रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.