Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Dharmaveer 2 box office collection first week : दिवंगत नेते आनंद दिघे यांचा बायोपिक धर्मवीरचे सीक्वल धर्मवीर २ आहे. आठवड्यापूर्वी हा सिनेमा प्रदर्शित झाला. एका आठवड्यात सिनेमानं बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवला आहे.
२०२२ साली म्हणजेच दोन वर्षांपूर्वी‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.तेव्हा या सिनेमाची प्रचंड चर्चा झाली. इतकंच नाही तर चित्रपटामुळं राजकीय गणितंही बदलल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेचे दिवंगत नेते व ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाला राजकीय टच असल्यानं याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. याच मुळं धर्मवीर २ सिनेमानं पहिल्या तीन दिवसांत बक्कळ कमाई केली होती. पहिल्या तीन दिवसांत प्रत्येक दिवशी सिनेमाची कमाई ही एक कोटींच्या वर होती. त्यानंतर तीन दिवस सिनेमाची कमाई घटल्याचं दिसून आलं होतं. तर ४ ऑक्टोबर रोजी निर्मात्यांनी या सिनेमाचं तिकीट फक्त ९९ इतकं ठेवलं होतं. याचा फायदा झालेला दिसून येतोय. आठव्या दिवशीच्या तुलनेत बऱ्यापैकी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय.
‘मला भूत दिसतेय…’ अभिनेत्याची बोबडी वळली; ज्याच्या हत्येच्या आरोपात खातोय जेलची हवा, त्याचे होतायंत भास
९९ च्या ऑफरनंतर कमाई वाढली की घटली? ‘धर्मवीर २’नं एका आठवड्यात कमावलाय तब्बल इतक्या कोटींचा गल्ला
प्रदर्शित झाल्यानंतर सात दिवसांत म्हणजे पहिल्या आठवड्यात सिनेमानं १०.९५ कोटींची कमाई केली आहे. सिनेमानं सातव्या दिवशी ४५ लाखांची कमाई केली होती. तर आठव्या दिवशी कमाई वाढल्याचं पाहायला मिळालं. sacnilkच्या नुसार धर्मवीर २ सिनेमानं आठव्या दिवशी ६५ लाखांच्या जवळपास कमाई केली आहे.
सायली-अर्जुनची लव्हस्टोरी पुढेच सरकेना! सूड घेण्यासाठी प्रियाची नवी चाल, प्रतिमाचा करणार वापर
एक नव्हे दोन साहेबांची गोष्ट
धर्मवीर २ चित्रपट हा साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट सांगत असला तरी, यात एक नव्हे तर दोन साहेबांची गोष्ट दाखवण्यात आली आहे, असं म्हणावं लागेल. आनंद दिघे यांच्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (क्षितिश दाते)च्या पडद्यावर दिसतात. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘लगे रहो मुन्ना भाई’ या सिनेमांतला यशस्वी प्रयोग इथंही करण्यात आलाय. काही खास प्रसंगांच्या वेळी आनंद दिघे एकनाथ शिंदे यांना दिसत असतात, असं सिनेमात पाहायला मिळतंय.