Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Astro Upay For Navratri Ashtami 2024 : महाअष्टमीला करा हे खास उपाय! नात्यातील अडचणी होतील दूर, पती-पत्नीतला दूरावा संपेल
Ashtami Tithi Upay : नवरात्रीचा सण हिंदू धर्मात अधिक खास मानला जातो. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते दशमी तिथीपर्यंत नवरात्रीचा काळ सुरु असतो. शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गाची पूजा केली जाते. दुर्गा देवीला शक्तीचे आणि शांतीचे रुप म्हटले जाते. देवीची साज शृंगारासह पूजा केल्याने नात्यातील अडचणी कमी होतात. जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होते.
नवरात्रीचा सण हिंदू धर्मात अधिक खास मानला जातो. आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते दशमी तिथीपर्यंत नवरात्रीचा काळ सुरु असतो. शारदीय नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी दुर्गाची पूजा केली जाते. दुर्गा देवीला शक्तीचे आणि शांतीचे रुप म्हटले जाते.
नवरात्रीत महाष्टमी तिथी अधिक खास मान्यात आली आहे. तिला महाष्टमी देखील म्हणतात. या दिवशी दुर्गा देवीच्या महागौरी रुपाची पूजा केली जाते. जीवनातील सर्व प्रकारचे दु:ख दूर करण्यासाठी या देवीची पूजा करावी. महागौरी पूजा केल्याने विवाहित जोडप्यांना फलदायी ठरते. भक्तिभावाने पूजा केल्याने जीवनातील संकटांपासून मुक्ती मिळते. त्याचबरोबर पती- पत्नीमधील भांडणेही दूर होतात. जाणून घेऊया महाष्टमीच्या दिवशी कोणते खास उपाय केल्याने वैवाहिक आयुष्य सुधारेल.
महाष्टमी विधी
नवरात्रीच्या आठव्या माळेला महाष्टमी किंवा अष्टमी असे म्हटले जाते. या दिवशी दुर्गा देवीच्या आठव्या रुपाची पूजा केली जाते. या दिवशी उपवासासह कन्या पूजन देखील केले जातात. ही तिथी प्रामुख्याने विवाहित महिलांसाठी खास असते. या दिवशी देवीची उपासना करण्यासह शृंगार देखील अर्पण केला जातो. ज्यामुळे वैवाहिक जीवन सुरळीत होते असे म्हटले जाते. देवीची साज शृंगारासह पूजा केल्याने नात्यातील अडचणी कमी होतात. जोडीदारासोबतचे नाते अधिक दृढ होते.
महाष्टमी तिथीचे महत्त्व
नवरात्रीच्या महाष्टमी तिथीला महागौरीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. महागौरी ही शांती, पवित्रता आणि सुखी वैवाहिक जीवनाचा आशीर्वाद देते. देवीचे स्मरण केल्याने वैवाहिक नात्यात गोडवा येतो. नात्यातील तणाव दूर होतो असे म्हटले जाते.
शेंदूर अर्पण करा
अष्टमीच्या दिवशी दुर्गादेवीला शेंदूर अर्पण करा, ज्यामुळे वैवाहिक जीवनात सुख- शांती लाभते. महागौरीच्या चरणाजवळ शेंदूर अर्पण करुन विवाहित महिला आपल्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि समजूतदारपणा वाढवू शकतात. तसेच यामुळे नात्यातील मतभेद दूर होतील.
पांढरी मिठाई अर्पण करा
अष्टमी तिथीला देवी महागौरीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी देवीला पांढरी मिठाई अर्पण करणे महत्त्वाचे मानले जाते. पांढरी मिठाई ही शुद्धता आणि शांततेचे प्रतीक आहे. महागौरीला पांढरा रंग अतिशय प्रिय मानला जातो. त्यामुळे मोठ्या भक्तीभावाने पांढऱ्या वस्तू अर्पण केल्याने वैवाहिक नाते सुधारते. नात्यात प्रेम टिकून राहाते.