Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Dhanteras 2024 : धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही खरेदी करु नका या वस्तू, लक्ष्मी देवी होईल नाराज, आर्थिक नुकसानाची शक्यता
What should we avoid on Dhanteras : हिंदू पंचांगानुसार धनत्रयोदशी अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. या दिवशी श्रीगणेश, धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. धनतेरसला धनत्रयोदशी असेही म्हटले जाते. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सुख-समृद्धीत वाढ होते. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी नवीन भांड्यांचीही पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या गोष्टींची खरेदी टाळावी? जाणून घेऊया
दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा, रोषणाईचा सण म्हणून ओळखला जातो. अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचे प्रतीक म्हणून या सणाला ओळखले जाते. अवघ्या काही दिवसात दिवाळीचा सण सुरु होईल.
दिवाळी ५ दिवसांची असते. त्यात असणारे प्रत्येक दिवस हे अधिक महत्त्वाचे असतात. अशातच नरक चतुर्दशीच्या आधी धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी धनाच्या देवाची पूजा केली जाते. यंदा धनतेरस हा सण २९ ऑक्टोबरला मंगळवारी साजरा करण्यात येणार आहे.
हिंदू पंचांगानुसार धनत्रयोदशी अत्यंत शुभ आणि फलदायी मानली जाते. या दिवशी श्रीगणेश, धन्वंतरी आणि देवी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. धनतेरसला धनत्रयोदशी असेही म्हटले जाते. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने सुख-समृद्धीत वाढ होते. धनत्रयोदशीच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. या दिवशी नवीन भांड्यांचीही पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी कोणत्या गोष्टींची खरेदी टाळावी? जाणून घेऊया
काचेची भांडी
धनतेरसच्या दिवशी काचेची भांडी खरेदी करु नका. हे शुभ मानले जात नाही. धनतेरस हा समृद्धीचा आणि संपत्तीचा सण आहे. या दिवशी काचेची भांडे खरेदी केल्याने अशुभ असते. तसेच सुख-समृद्धीत अडथळे निर्माण होतात. काचेची भांडी खरेदी केल्याने घराच्या आर्थिक स्थितीत अडथळे येतात.
लोखंडाच्या वस्तू
धनतेरसच्या दिवशी लोखंडी वस्तू खरेदी करणे टाळावे. असे म्हटले जाते की, लोखंडाचा संबंध शनिदेवाशी आहे. हा दिवस देवी लक्ष्मी आणि गणपतीला समर्पित आहे. या दिवशी लोखंडी वस्तू खरेदी केल्याने कामात अडथळे येतात. व्यक्तीला कधीही शुभ फळ मिळत नाही. धनतेरसला सोने, चांदी किंवा धातूच्या वस्तू खरेदी करणे फायदेशीर मानले जाते.
काळ्या रंगाच्या वस्तू
धनतेरसला काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करणे टाळावे. काळा रंगाचा माणसाच्या जीवनावर विशेष प्रभाव पडतो. त्यामुळे या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करु नका.
तेलाची खरेदी
धनतेरसला राईचे तेल खरेदी करणे अशुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार राईच्या तेलाचा शनिदेवाशी संबंध असून ते अर्पण केले जाते. या दिवशी तेलाचे दान केल्याने कुंडलीतील शनीची स्थिती कमकुवत होते. तसेच अशुभ परिणाम मिळतात.