Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सिंघम अगेन Vs भूल भुलैया ३: कोण करणार दिवाळी धमाका आणि कोण ठरेल फुसकी बार? Advance Booking ला दमदार सुरुवात
Singham Again Vs Bhool Bhulaiyaa 3 Advance Booking: येत्या १ नोव्हेंबर रोजी ‘सिंघम अगेन’ Vs ‘भूल भुलैया ३’ अशी तगडी टक्कर बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळणार आहे.
हायलाइट्स:
- ‘सिंघम अगेन’ आणि ‘भूल भुलैया ३’च्या आगाऊ बुकिंगला सुरुवात
- पहिल्या वीकेंडला होणार मोठी कमाई
- एकाच दिवशी रीलिज होतायंत बिग बजेट सिनेमे
‘भूल भुलैया ३’चे आगाऊ बुकिंग
भूल भुलैया ३चे अॅडव्हान्स बुकिंग ‘सिंघम अगेन’च्या एक दिवस आधी सोमवारी सुरू झाले. sacnilk च्या रिपोर्टनुसार, बुधवार ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत या हॉरर-कॉमेडीच्या ९२ हजार ४३३ तिकिटांची विक्री झाली आहे. हे बुकिंग सिनेमाच्या एकूण ५ हजार ३६३ शोसाठी झाले असून यामधून २.७१ कोटी रुपयांची कमाई केली.
मुलांना सांभाळणाऱ्या महिलेशी अरमान मलिकचे चौथे लग्न? युट्यूबरची बायको म्हणाली- ‘आम्ही दोघीच त्याच्या पत्नी’
‘सिंघम अगेन’चे आगाऊ बुकिंग
दुसरीकडे, बुधवारी ‘सिंघम अगेन’च्या ॲडव्हान्स बुकिंगला जो मिळालेला वेग आश्चर्यकारक आहे. मंगळवारी या चित्रपटाच्या केवळ ४५३ शोसाठीच आगाऊ बुकिंग झाले. मात्र बुधवारी सकाळपासून ५ हजार ५६० शोचे प्री-सेल्स बुकिंग सुरू झाले आहे. ३० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत ‘सिंघम अगेन’ची ५३ हजार ७०१ तिकिटे विकली गेली. यातून सिनेमाने १.८१ कोटींचा व्यवसाय केला आहे. मंगळवारी दुपारी ही कमाई अवघ्या १६.४७ लाखांवर होती. अवघ्या २४ तासांत यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.
दोन्ही चित्रपटांच्या आगाऊ बुकिंगसाठी अजून दोन दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या कमाईच्या आकड्यांमध्ये अनेक बदल होऊ शकतात. ‘सिंघम’ आणि ‘भूल भुलैया’ या दोन्ही फ्रँचायझी लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहेत, त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या दोन्ही चित्रपटांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे. स्क्रिन शेअरिंगच्या बाबतीत, मल्टिप्लेक्समध्ये ‘सिंघम अगेन’ हा सिनेमा आघीडवर आहे. मीडिया रिपोर्टनुसार या दोन्ही चित्रपटांना ६०:४० च्या प्रमाणात शो मिळाले. मात्र ‘भूल भुलैया ३’ने सिंगल स्क्रिन थिएटरमध्ये प्रीमियम शोदेखील जास्त प्रमाणात मिळवले आहेत.
किती आहे दोन्ही सिनेमांचे बजेट?
दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’चे बजेट ४०० कोटींच्या घरात असून, दिग्दर्शक अनीस बज्मीच्या ‘भूल भुलैया ३’चे बजेट १५० कोटी आहे. अशा परिस्थितीत ‘सिंघम अगेन’ला हिट, सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर होण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागणार आहे. ‘सिंघम अगेन’ला महाराष्ट्र सर्किटमध्ये खूप फायदा होईल, महाराष्ट्रात ही फ्रेंचायझी आणि रोहित शेट्टीच्या चित्रपटांनी नेहमीच चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे, दिल्ली-एनसीआर, बिहार, यूपी, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील प्रेक्षक त्यांच्या संघर्षाचा खरा निकाल ठरवतील.
पहिल्या वीकेंडला दोन्ही चित्रपट मिळून किमान २०० कोटी रुपयांची कमाई करतील, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. असे झाल्यास हा वीकेंड सर्वात यशस्वी वीकेंड ठरेल. याआधी गेल्या वर्षी ‘एनिमल’ आणि ‘सॅम बहादूर’ या सिनेमांनी पहिल्या वीकेंडला १९० कोटींची कमाई केली होती.