Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Singham Again Box Office : दिग्दर्शक रोहित शेट्टीचा मल्टीस्टारर ‘सिंघम अगेन’ दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. पहिल्याच दिवशी सिनेमाने जबरदस्त कमाई केली आहे.
हायलाइट्स:
- ‘सिंघम अगेन’ हा चित्रपट १ नोव्हेंबरला दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला
- यात अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, करीना कपूर असे अनेक कलाकार आहेत.
- पहिल्याच दिवशी या सिनेमाने ‘भूल भुलैया’ला मागे टाकले.
सायलीचे तडकाफडकी पक्षांतर! अर्जुनला दगा देत मधुभाऊंचा वकील बदलला, प्रियाला समजलंय सत्य, टाकणार नवं जाळं
या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ‘भूल भुलैया’ला मागे टाकलं
जबरदस्त अडव्हान्स बुकिंगमुळे चित्रपटाने पहिल्या दिवशी घसघशीत कमाई करायला सुरुवात केली होती. ‘भूल भुलैया ३’ नंतर या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले होते. मात्र, आता या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ‘भूल भुलैया ३’ला मागे टाकत पुढे मजल मारली आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, या चित्रपटाने जवळपास ४३.५० कोटींची ग्रँड ओपनिंग केली आहे.
सिंघम अगेन चित्रपटाच्या जगभरातील कलेक्शनबद्दल अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या चित्रपटाचा एकूण हिंदी व्यवसाय सुमारे ६२.४०% होता.
सिनेपात्रापेक्षा फारच खतरनाक आहे खऱ्या मंजुलिकाची कहाणी, अंगावर येईल काटा; त्या बंगाली मुलीचा भयानक इतिहास
सोमवारपासून खरी परीक्षा सुरू
हा चित्रपट किती धमाकेदार आहे, याचे खरे सत्य सोमवारपासून समोर येईल. चित्रपट बरेचदा सुरुवातीच्या वीकेंडला त्यांच्या अडव्हान्स बुकिंगमुळे आणि सुट्यांमुळे पैसे कमवतात. मात्र त्यांची खरी स्पर्धा ही सोमवारपासून सुरू होणार असते. त्यातच चित्रपट पुढे जातो की नाही हे समजते. ‘स्त्री २’ ने पहिल्या सोमवारी ३८.१ कोटी रुपयांची कमाई केली होती आणि सलग १३ दिवस ही सिनेमाची कमाई ही दोन अंकीच होती.
सिंघम अगेनची छप्परफाड कमाई! पहिल्याच दिवशी भूल भुलय्या ३ ला टाकलं मागे, किती कमावले?
एखादा चित्रपट हिट किंवा ब्लॉकबस्टर होण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल.
रोहित शेट्टीने दिग्गज सिनेतारकांची फौज उभी करून हा चित्रपट बनवण्यासाठी जवळपास ४०० कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यामुळे चित्रपटाला हा खर्च भरुन काढण्यासाठी किमान दुसऱ्या वीकेंडपर्यंत चांगली दोन अंकी कमाई करावी लागेल. त्याचबरोबर हिट किंवा ब्लॉकबस्टरच्या होण्यासाठी खूप मेहनत करावी लागणार आहे.