Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आधीच्या दोन भागांपेक्षा हिट ठरला भूल भुलय्या ३, दिवाळीत डबल धमाका,बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर पैशाचा पाऊस

6

यंदाची दिवाळी बॉलिवूडसाठी खास ठरली आहे. ‘भूल भुलय्या 3’ आणि सिंघम अगेन हे दोन्ही सिनेमे रिलीज झाले आहेत. भूल भुलय्या ३ चा पहिल्या दिवशीचा बॉक्स ऑफिस रिपोर्ट जाणून घेऊ,

हायलाइट्स:

  • दिवाळीला रिलीज झालेल्या ‘भूल भुलय्या ३’ ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली.
  • कार्तिक आर्यनची सिनेमात प्रमुख भूमिका
  • या चित्रपटात विद्या बालन पुन्हा एकदा मंजुलिकाच्या भूमिकेत दिसल्याने प्रेक्षक खुश

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई– यंदाचे वर्ष हॉरर कॉमेडी सिनेमांनी सर्वाधिक गाजवले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. शैतान, मुंज्या, स्त्री २ या सिनेमांनंतर आता भूल भुलय्या ३ हा सिनेमा थिएटर गाजवतोय. दिवाळीला रिलीज झालेल्या ‘भूल भुलय्या ३’ ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. ‘मुंज्या’ आणि ‘स्त्री २’ सारख्या चित्रपटांनंतर आता तिसरा चित्रपट ‘भूल भुलय्या ३’ देखील चित्रपटगृहांमध्ये धुमाकूळ घालायला लागला आहे. या फ्रेंचाइजीचे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडले होते. पहिल्या ‘भूल भुलय्या’मध्ये मंजुलिकाची भूमिका साकारणारी विद्या बालन दुसऱ्या मालिकेत दिसली नाही. मात्र आता या तिसऱ्या चित्रपटातून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटायला परत आली आहे. मंजुलिका हीच या चित्रपटाची जान असल्याचे बोलले जात आहे.

प्रपोज करुनही गौरीचा नकार, शाहरुखच्या आईचे निधन होताच लगेच होकार, एकाच दिवशी तीन पद्धतीत उडवला लग्नाचा बार
‘भूल भुलय्या ३’ ची पहिल्या दिवशी कमाई

Sacnilk रिपोर्टनुसार, या चित्रपटाची जबरदस्त अडव्हान्स बुकिंग झाली होती. हा चित्रपट दिवाळीला प्रदर्शित झाला. रिलीज होताच त्याने सुमारे ३५.५० कोटींची मोठी कमाई केली. ही कमाई ‘भूल भुलय्या’च्या आधीच्या दोन चित्रपटांपेक्षा खूप जास्त आहे.

सिंघम अगेनची छप्परफाड कमाई! पहिल्याच दिवशी भूल भुलय्या ३ ला टाकलं मागे, किती कमावले?
‘भूल भुलय्या ३’ चे जगभरातील कलेक्शन

जगभरातील कलेक्शनबद्दल बोलायचे झाल्यास, त्याचे ठोस आकडे अद्याप समोर आलेले नाही. हा सिनेमा अधिक भयावह वाटावा यासाठी यंदा व्हीएफएक्सवर चांगले काम करण्यात आले आहे. रूह बाबा म्हणून कार्तिक प्रेक्षकांचे चांगलाच पसंतीस उतरताना दिसत आहे. माधुरी दीक्षित पाहुणी कलाकाराच्या भूमिकेत दिसत असली तरी ती पहिल्यांदाच ग्रे शेड्स साकारत आहे. माधुरीच्या भूमिकेचेही कौतुक होत आहे.

आधीच्या दोन भागांपेक्षा हिट ठरला भूल भुलय्या ३, दिवाळीत डबल धमाका,बॉलिवूड बॉक्स ऑफिसवर पैशाचा पाऊस

राजपाल यादव आणि संजय मिश्रा

या चित्रपटात छोट्या पंडितच्या भूमिकेत राजपाल यादव, अश्विनी काळसेकर आणि मोठ्या पंडितच्या भूमिकेत संजय मिश्रा यांनी धमाल उडवून दिली आहे. जवळपास १५० कोटींच्या बजेटमध्ये हा चित्रपट बनवण्यात आला असल्याचं सांगण्यात येत आहे. पहिल्याच आठवड्यात जर का सिनेमाने बंपर कमाई केल्यास तो नक्कीच सुपरहिट ठरू शकतो.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.