Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Rohit Shetty चा धमाका, सिंघम अगेनची बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई, दुसऱ्याच दिवशी १०० कोटी पार

7

Singham Again Box Office: रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ या चित्रपटाने थिएटरमध्ये धुमाकूळ उडवून दिला आहे. पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी या चित्रपटाला थोडे कमी प्रेक्षक मिळाले पण तरीही दमदार कमाई केली.

हायलाइट्स:

  • ‘सिंघम अगेन’ने दुस-या दिवशी चांगली कमाई केली
  • चित्रपटाने अंदाजे ४१.५ कोटी रुपयांची कमाई केली.
  • ‘सिंघम अगेन’ जगभरातील २००० हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई– रोहित शेट्टीचा सिंघम अगेन दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज झाला आहे. अजय देवगण, अक्षय कुमार, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण आणि अर्जुन कपूर यांच्यासह अनेक कलाकारांनी या सिनेमात अभिनय केलेला. हा चित्रपट कार्तिक आर्यनच्या ‘भूल भुलैया ३’ तगडी स्पर्धा देत आहे. सिंघम अगेनने रिलीज झाल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर आपली पकड निर्माण करायला सुरूवात केली होती. त्याच्या कलेक्शनने आधीच तो मोठा हिट होण्याचे संकेत दिले आहेत. सॅकनिकच्या मते, सिंघम अगेनने पहिल्या दिवशी ४३.५ कोटींची कमाई केली होती. शनिवारी चित्रपटात थोडीशी घसरण झाली, परंतु तरीही सुरुवातीच्या अंदाजानुसार, चित्रपटाने सुमारे ४१.५ कोटी रुपयांची कमाई केली असून, दोन दिवसांत एकूण कमाई ८५ कोटी रुपये झाली आहे. नवीन अपडेटनुसार, चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा पार केला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ६५ कोटींची कमाई करून जगभरात धमाका केलेला.

या सुपरस्टारच्या बायकोच्या प्रेमात होते सचिन पिळगावकर; लग्न ठरलं, पण तिच्या आईनेच केली अडचण
‘भूल भुलैया ३’ शी स्पर्धा

दरम्यान, ‘भूल भुलैया ३’ देखील उत्तम कामगिरी करत असून तो हिट होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, दिवाळीच्या सुट्ट्यांनंतरही सिनेमांना त्यांचे स्थान टिकवून ठेवण्यात अडचणी येऊ शकतात. सोमवारच्या कलेक्शननंतरच हा चित्रपट भविष्यात काय कामगिरी करेल हे समजेल.

‘फक्त हिंदीच सिनेमे चांगले नसतात’, मराठमोळ्या सोनाली कुलकर्णीने थेट श्रीदेवीशी घेतलेला पंगा
जगभरातील अनेक स्क्रीनवर रिलीजचा फायदा

‘सिंघम अगेन’ जगभरातील २००० हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे, ज्याचा त्यांना भरपूर फायदा मिळतोय. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि फिजीमध्ये १९७ स्क्रीन, उत्तर अमेरिकेत ७६० हून अधिक स्क्रीन, यूके आणि आयर्लंडमध्ये २२४ स्क्रीन मिळाल्या. या रिलीजचा चित्रपटाला खूप फायदा होत आहे.

Rohit Shetty चा धमाका, सिंघम अगेनची बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई, दुसऱ्याच दिवशी १०० कोटी पार

‘सिंघम अगेन’ची कास्ट

‘सिंघम अगेन’ हा रोहित शेट्टीच्या पोलीस फोर्स सिनेमांचा एक भाग आहे, या सिनेमात सूर्यवंशी आणि सिंबा या पात्रांचाही समावेश आहे. यात अजय देवगण, रणवीर सिंह, अक्षय कुमार, करीना कपूर खान, टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, जॅकी श्रॉफ, श्वेता तिवारी आणि अर्जुन कपूर या कलाकारांचा समावेश आहे.

आकांक्षा तळेकर

लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा ३ वर्षांचा अनुभव आहे.तसेच माझी सहेली मॅगझिन मध्ये १ वर्षाचा अनुभव
आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. मनोरंजनसोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.