Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Ratnagiri Crime News: शाळेतील सरस्वतीची मूर्ती ही हॉलमध्ये असताना त्याठिकाणी कार्यक्रम घेणे आवश्यक होते. मात्र सदरचा गरबा नृत्याचा कार्यक्रम भर कडक उन्हात ठेवलेला असल्याने माझ्या मुलीसह अन्य अनेक मुली दुपारी २.०० वाजल्यापासून सदर शाळेच्या प्रांगणात भर कडक उन्हात गरबा नृत्य खेळत होत्या.
हायलाइट्स:
- माझ्या मुलीच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करा; आम्हाला न्याय द्या
- गरबा खेळताना मुलीचा मृत्यू प्रकरणी वडिलांची गंभीर तक्रार
- पोलीस अधीक्षक आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार
देवेंद्र फडणवीस कोणाला घाबरले, किम जोंगपासून त्यांना धोकाय का? – संजय राऊत
शाळेतील सरस्वतीची मूर्ती ही हॉलमध्ये असताना त्याठिकाणी कार्यक्रम घेणे आवश्यक होते. मात्र सदरचा गरबा नृत्याचा कार्यक्रम भर कडक उन्हात ठेवलेला असल्याने माझ्या मुलीसह अन्य अनेक मुली दुपारी २.०० वाजल्यापासून सदर शाळेच्या प्रांगणात भर कडक उन्हात गरबा नृत्य खेळत होत्या असा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे. माझी मुलगी वैष्णवी हिला दुपारी २.४५ च्या दरम्याने पहिल्यांदा अस्वस्थ वाटू लागले म्हणून ती थोडावेळ बाजूला थांबली. पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नव्हती. त्यामुळे ती थोडी बाजूला राहून ५ ते १० मिनिटांनी सावध झाली व तिला थोडे बरे वाटल्यानंतर पुन्हा ती गरबा नृत्य खेळू लागली. तेव्हा तिला पुन्हा कार्यक्रमात सहभागी होण्यापासून शाळेतील कर्मचाऱ्यांनी थांबविणे गरजेचे होते. परंतु तिथे शाळेचे कोणीही कर्मचारी उपस्थित नव्हते. पुन्हा कु. वैष्णवी हिला ३.०० ते ३.१५ च्या दरम्याने चक्कर आली व ती भर उन्हात मैदानातच खाली कोसळली. त्यावेळेस शाळेचा कुणीही कर्मचारी अथवा शिक्षक अगर मुख्याध्यापक त्याठिकाणी आलेले नाहीत. सदर शिक्षक, मुख्याध्यापक व कर्मचारी हे शाळेच्या इमारतीत आपआपल्या रुममध्ये बसून होते. तिला सुमारे दहा ते पंधरा मिनिटे कोणीही बघण्यास आलेले नाही अगर तिला उचलून स्टाफरूममध्ये नेलेले नाही. तिथे उपस्थित असलेले विद्यार्थी तिला पाणी पाजण्याचा प्रयत्न करुन तिच्या सोबत असलेल्या मुली व मुले शिक्षकांना ‘वैष्णवीला डॉक्टरकडे न्या, कार्यक्रम बंद करा, डीजे बंद करा, गाडी घेवून या’ अशा प्रकारचा आरडाओरडा करुन विनंती करत होत्या. शाळेतील काही शिक्षकांच्या चारचाकी गाड्या असून गाडीत घालून त्वरीत डॉक्टरकडे नेण्याचे कोणीही सौजन्य दाखविले नाही असाही गंभीर आरोप या तक्रारीत वैष्णवीचे वडील प्रकाश माने यांनी केला आहे.
शाळेच्या शेजारीच खाजगी डॉक्टरांचा दवाखाना आहे. माझी मुलगी वैष्णवी ही सुमारे ३० ते ४० मिनिटे बेशुद्धावस्थेत असताना तिला खाजगी डॉक्टरकडे सुद्धा नेलेले नाही. तसेच शाळेपासून सुमारे १०० ते २०० मीटर अंतरावर अन्य खाजगी डॉक्टर असताना त्यांचेकडे सुद्धा नेलेले नाही. सुमारे १ तासानंतर शाळेपासून सुमारे ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात शिक्षकांच्या गाडीतून घेवून गेले. तिच्या समवेत शिक्षिका व मुली होत्या. मुलीच्या सांगण्यानुसार रायपाटण ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर हे सुद्धा कु. वैष्णवी ही बेशुद्ध असताना देखील दहा ते पंधरा मिनिटांनी आले. तसेच तिला ऑक्सीजनची गरज असताना निव्वळ १०८ ला फोन करा असे बोलून उपचार करण्यास दिरंगाई करु लागले. या सर्व प्रकारामुळे माझी मुलगी कु. वैष्णवी हिचा मृत्यू झाला असं गंभीर आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
US Elections 2024: होऊ दे खर्च… अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीसाठी किती होणार खर्च? जाणून घ्या
तिचा मृत्यू कशामुळे झाला याकरीता रायपाटण ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तिचे घेतलेले सॅम्पल हे सुमारे आठ दिवस त्याच हॉस्पिटलमध्ये पडून होते. ते तातडीने पुढील तपासणीकरीता पाठविणे आवश्यक असताना डॉक्टरांनी देखील आपल्या कर्तव्यात कसूर केल्याचा संशय या तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणी चौकशी दरम्यान कोणती माहिती व वस्तुस्थिती अधिकृतपणे समोर येते हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचे ठरणार आहे.