Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

फडणवीसांनी ४० नेत्यांना पक्षातून हाकललं; भाजप उमेदवाराविरोधात शिंदेंच्या जवळच्या माणसाचं काय?

11

Nanded News : भाजप महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मिलिंद देशमुख, वैशाली देशमुख, संजय घोगरे पाटील, सुनील मोरे आदींचा समावेश आहे.

Lipi

अर्जुन राठोड, नांदेड : राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुतीत बंडखोरी झाली आहे. विनंती करूनही अर्ज कायम ठेवल्याने भाजपने अखेर ४० बंडखोरांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नांदेडमध्ये बंडखोरी करणाऱ्या महानगर अध्यक्षांसह पाच जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. भाजप महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, भाजपचे विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष मिलिंद देशमुख, वैशाली देशमुख, संजय घोगरे पाटील, सुनील मोरे आदींचा समावेश आहे.

नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण ही जागा महायुतीतील शिवसेना शिंदे गटाला सुटली आहे. शिंदे गटाने नांदेड उत्तरमधून आमदार बालाजी कल्याणकर आणि नांदेड दक्षिणमधून आनंद बोढारकर यांना उमेदवारी दिली आहे. असं असताना नांदेड दक्षिणमधून भाजपचे दिलीप कंदकुर्ते, संजय घोगरे पाटील आणि सुनील मोरे यांनी बंडखोरी केली, शिवाय नांदेड उत्तर मधून मिलिंद देशमुख यांनी अर्ज दाखल केला.
Rupesh Mhatre : बंड मागे, तरी हकालपट्टी; वरुण-आदित्य यांच्यावरुन टीका जिव्हारी, उद्धव ठाकरेंचा तडक निर्णय
दोन्ही मतदारसंघातील बंडखोरी शमणार अशी शेवटपर्यंत चर्चा होती, पण भाजप पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी कायम ठेवली. भाजप नेत्यांची शिष्टाई देखील कामाला आली नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नांदेडच्या पाच बंडखोरासह राज्यातील ४० जणांवर निलंबनाची कारवाई केली.

BJP Rebel sacked : बंडखोरांची गय नाही, भाजपने ४० नेत्यांना पक्षातून हाकललं; भाजप उमेदवारा विरोधात शिंदेंच्या ‘जवळच्या माणसा’चं काय?

नांदेड उत्तरमधून बंडखोरी केलेल्या मिलिंद देशमुख आणि त्यांची पत्नी वैशाली देशमुख यांची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत दिलीप कंदकुर्ते यांनी बंडखोरी केली होती, त्यानंतर पुन्हा त्यांना पक्षात घेण्यात आले.
Sanjay Raut : शिवरायांचं मंदिर उभारण्याची तोंड वेंगाडून चेष्टा, संजय राऊत भडकले, म्हणतात फडणवीसांच्या पूर्वजांनी…
दरम्यान, याबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी सूतोवाच केले होते. राज्यातील महायुतीमधील बंडखोरांचा अहवाल हा प्रदेशाध्यक्षांपर्यंत पोहचला आहे. बंडाखोरांवरील कारवाई हा राज्यस्तरावरील विषय असून प्रदेशाध्यक्ष यावर निर्णय घेतील. तसेच नांदेड जिल्ह्यात महायुतीत कुठल्याही प्रकारचा बेबनाव नसल्याचे अशोक चव्हाण म्हणाले होते.

दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडून मुखेड मतदारसंघात बंडखोरी झाल्याचे पहायला मिळत आहे. मुखेड मतदारसंघात भाजपचे तुषार राठोड हे उमेदवार असताना बालाजी खतगावकर यांनी बंडखोरी करत निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. बालाजी खतगावकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खाजगी सचिव आहेत. पदाचा राजीनामा देत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. खतगावकर यांनी बंडखोरी कायम ठेवल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.