Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

विजय वडेट्टीवारांची जीभ घसरली, मतदारांबद्दल अपशब्द वापरला, भाजपने शेअर केला Video

5

Chandrapur Vijay Vadettiwar Video Viral: ”काँग्रेसचा हात, मतदारांचा घात” अशी टॅगलाईन लिहिलेला व्हिडिओ भाजप महाराष्ट्र या अकाउंटवरून ट्वीटवर (एक्स) व्हायरल करण्यात आलेला आहे. यात किती सत्यता आहे हे मात्र कळू शकलेलं नाही.

हायलाइट्स:

  • विजय वडेट्टीवार मतदारांनाच म्हणाले हरामखोर
  • भाजपने केला व्हिडिओ शेअर
  • काय लिहिलं आहे पोस्टमध्ये?
Lipi
विजय वडेट्टीवार मतदार अपमान

निलेश झाडे,चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत ज्या चुका भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केल्या होत्या, त्याच चुकांवर पाऊल ठेवण्याची आत्मघाती चूक काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ”काँग्रेसचा हात, मतदारांचा घात” अशी टॅगलाईन लिहिलेला व्हिडिओ भाजप महाराष्ट्र या अकाउंटवरून ट्वीटवर (एक्स) व्हायरल करण्यात आलेला आहे. यात किती सत्यता आहे हे मात्र कळू शकलेलं नाही. या व्हिडिओवर आलेल्या प्रतिक्रिया वडेट्टीवार यांच्या प्रतिमेला नक्की धक्का देणाऱ्या ठरल्या आहेत.

काय लिहिलं आहे पोस्टमध्ये?

”काँग्रेसचा हात, मतदारांचा घात”, कॉंग्रेस नेते, @VijayWadettiwar मतदारांना हरामखोर म्हणत आहे, 20 तारखेनंतर तुला पाहून घेइन, तुमचे नाव लिहून ठेवले आहेत. अशी धमकीच त्यांनी मतदारांना दिली आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो मात्र लोकशाही, संविधान, अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा काँग्रेसला सुरुवातीपासूनच तिटकारा आहे. ज्या काँग्रेसने संविधानाची पायमल्ली करत देशावर आणीबाणी लादली असंख्य सामान्य लोकांना तुरूंगात डांबून ठेवले ती काँग्रेस पुन्हा मतदारांना धमकवण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्राची जनता मतदानातून काँग्रेसची ही मस्ती नक्कीच उतरवणार…

महान संत शरदचंद्रजी पवार, मराठवाड्यात राज ठाकरेंचा एल्गार, सत्ता नसताना नोकऱ्या लावल्या, एकदा…

एका युजरने लिहिलं आहे की, ”हे आहेत विरोधी पक्षनेते शोभते का यांना अशी भाषा उमेदवार धमकी देत आहे याची दखल निवडणूक आयोगाने घ्ययला पाहिजे. पराभवाच्या भीतीतून त्यांचे वक्तव्य” असं एका युजरने लिहिलं आहे. तर, ”काय ही भाषा जनता नकी घरी बसवेल याला”, असा थेट इशाराच एका युजरने दिला आहे.

चंद्रपूरच राजकारण कुणी नासवलं?

कधी चंद्रपूरच्या शुद्ध राजकारणाचे दाखले राज्यात दिले जायचे. आता इथलं राजकारण पूर्णपणे नासलं असल्याचे बोललं जातं आहे. एक खासदार जातीवर बोलतोयं, मंत्री महिलांचा अपमान करतोय, यवतमाळ जिल्हातील वणी येथील भाजपच्या कार्यक्रमात ओबीसी बांधवावर खालच्या पातळीची टीका करण्यात आली. त्याची धग चंद्रपूरपर्यंत येऊन पोहचली आहे. या गढूळ झालेल्या राजकारणाला जबाबदार कोण? याची चर्चा आता रंगली आहे. ज्यांना केवळ जातीय समीकरणच दिसतात त्यांनी येथील राजकारणाला खालचा पातळीवर नेवून ठेवल्याची चर्चा रंगली आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.