Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Rahul Gandhi: राहुल गांधी दौऱ्यावर, नाना पटोले अलिप्त; मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेचची चर्चा

9

Rahul Gandhi Nagapur Constituent Program: ओबीसी युवा मंचचे उमेश कोर्राम तसेच अनिल जयहिंद यांनी या संमेलनासाठी पुढाकार घेतला आहे. हा अराजकीय कार्यक्रम असल्याचा काँग्रेस नेत्यांचा दावा आहे. या संमेलनाची सर्व सूत्रे काँग्रेसकडून हलवली जात आहेत.

हायलाइट्स:

  • राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान सन्मान संमेलन
  • राहुल गांधी यांच्या कार्यक्रमात पटोले अलिप्त
  • प्रदेशाध्यक्ष-विरोधी पक्षनेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेचची चर्चा
महाराष्ट्र टाइम्स
राहुल गांधी नागपूर दौरा नाना पटोले

म. टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : उपराजधानीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस हायकमांड राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान सन्मान संमेलन होत आहे. या संमेलनापासून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले अलिप्त आहेत. त्यांना मुद्दाम दूर ठेवले का, असा प्रश्न पक्षातील अन्य नेत्यांना पडला आहे. आज, बुधवारी हे संमेलन होत आहे. ओबीसी युवा मंचचे उमेश कोर्राम तसेच अनिल जयहिंद यांनी या संमेलनासाठी पुढाकार घेतला आहे. हा अराजकीय कार्यक्रम असल्याचा काँग्रेस नेत्यांचा दावा आहे. या संमेलनाची सर्व सूत्रे काँग्रेसकडून हलवली जात आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पहिल्यांदा घेतलेल्या पत्रकार परिषदेत संमेलनाची माहिती देताना राहुल गांधी यांचा सहभाग राहणार असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेस माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अॅड. अभिजित वंजारी, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे उपस्थित होते. यात कुठेही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा उल्लेख झाला नाही. ते नागपुरात येणार आहे की कसे, याबद्दल अन्य नेत्यांना कल्पना नाही. विजय वडेट्टीवार यांच्याकडे जबाबदारी आल्याने पटोले स्वत:हून दूर झाले का, की त्यांना बाजूला करण्यात आले, असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. काँग्रेसच्यादृष्टीने मुद्दा व कार्यक्रम महत्त्वाचा असल्याने यापासून स्वत:ला दूर ठेवण्याची पटोलेंची दुटप्पी भूमिका आहे का, असा सवालही उपस्थित होत आहे.
Vijay Vadettiwar: विजय वडेट्टीवारांची जीभ घसरली, मतदारांबद्दल अपशब्द वापरला, भाजपने शेअर केला Video

राज्यात आघाडीची सत्ता येईल, असा काँग्रेस व मित्रपक्षाच्या नेत्यांचा दावा आहे. बऱ्याच नेत्यांना आतापासून मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत. काँग्रेसमध्ये दावेदारांची यादी कमी नाही. विरोधी पक्षनेते हे ‘शॅडो’ मुख्यमंत्री मानले जातात. त्यामुळे वडेट्टीवार समर्थक अधिक सक्रिय आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही अनेक वर्षांपासून या पदाच्या प्रतीक्षेत आहेत. यातून काँग्रेसमध्ये गटबाजी व छुपे द्वंद्व समोर आल्याची चर्चा आहे.

चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांना पदावरून हटवण्याच्या निर्णयावर दीड वर्षापूर्वी नाना पटोले व विजय वडेट्टीवार यांच्यातील वाद बराच गाजला. वडेट्टीवार यांच्या निवासस्थानी यानुषंगाने बैठका झाल्या होत्या. पटोले यांनी बंद खोलीत निर्णय करू, असे सांगताच, बंद खोलीत निर्णय करण्याइतका मोठा नेता कुणी नाही, असा पलटवार वडेट्टीवार यांनी केला होता, हे विशेष.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.