Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
‘देवेंद्र फडणवीस आणि भाजप राहुल गांधींना घाबरतात, त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे…’ नाना पटोलेंचे टीकास्त्र
Nana Patole On Devendra Fadnavis and BJP : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुल गांधी यांना घाबरत असल्याचं म्हणत त्यांच्यावर आरोप केले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘शहरी नक्षलवाद पसरवण्याचा आरोप’ केला होता, यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना प्रश्न उपस्थित केला, “जर लेफ्टीस हा देशविरोधी असं म्हणायचं असेल, तर केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये लेफ्टीसांचं सरकार आहे. त्यांना मतदान करणारे लोक देशविरोधी आहेत का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Ahilya Nagar News : कमळाने टायमिंग साधले, घड्याळाच्या प्रचारात सक्रीय; अहिल्यानगरमध्ये प्रचारासाठी दोन्ही पक्ष साथ-साथ
नाना पटोले म्हणाले, या देशामध्ये लेफ्टीस हे या देशाचे विरोधक आहे, असं त्यांचं म्हणणं असेल, तर केरळमध्ये लेफ्टीसांचे सरकार आहे. पश्चिम बंगालमध्ये लेफ्टीसांचं सरकार होतं. या देशामध्ये अनेक भागामध्ये खासदार आणि आमदार लिफ्टीस निवडून येतात. मग त्यांना मतदान करणारे ते ही देशविरोधी आहेत काय? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला.
Ujjain News : झोमॅटोवरुन शाहाकारी भाजी ऑर्डर केली, पण पार्सलमध्ये भलतंच निघालं; अन्न विभागाची मोठी कारवाई
पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले की, भाजपला कोणाला सर्टिफिकेट देण्याचा अधिकार नाही. या देशाच्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक नागरिकाला, त्याला कोणाला निवडून द्यायचं आहे, तो त्याचा अधिकार आहे. आता हे लेफ्टिस लोक सगळे आतंकवादी आणि नक्शलवादी आहे, तर केंद्रात तर यांच्या जवळ स्वयंभू भगवान आणि स्वयंभू विश्वगुरू सत्तेमध्ये आहेत. मग जर हे सगळे देशविरोधी आहेत तर यांना जेलमध्ये का टाकत नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
‘देवेंद्र फडणवीस आणि भाजप राहुल गांधींना घाबरतात, त्यांच्या वाढत्या प्रभावामुळे…’ नाना पटोलेंचे टीकास्त्र
नाना पटोले पुढे म्हणाले की, या पद्धतीचे फेक नरेटिव्ह निवडणुकीच्या काळात टाकून, अशी मोहीम हे चालवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपची सर्वात मोठी अडचण ही राहुल गांधी आहेत. राहुल गांधींना हे घाबरतात, राहुल गांधी हे नागपूरला आले आणि यांची दुकान बंद व्हायला निघाली, त्यामुळे घाबरुन देवेंद्र फडणवीस आणि भाजपने अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं आहे, असं नाना पटोले म्हणाले.