Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Buldhana Brother Died In Accident: बहिणीला तिच्या सासरी सोडायला गेलेल्या भावाचा अपघाती मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ पसरली आहे. बुलढाणा येथे ही घटना घडली आहे.
बहिणीला सोडायला गेला अन् परतलाच नाही
अरकार्नुद्दीन शेख मुस्तकीम (वय वर्ष १८, राहणार देऊळघाट जिल्हा बुलढाणा) हा युवक सोमवारी त्याच्या बहिणीला तिची सासुरवाडी देऊळगाव साखरशा येथे दुचाकीने सोडायला गेला होता. दूचाकीवरुन परत येत असताना शिरला नेमाने गावाजवळ एका भरधाव चारचाकी गाडीने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात अरकार्नुद्दीन हा गंभीर जखमी झाला होता.
Pune News: धूर अन् धडाम…. फटाक्यांमुळे दुचाकींची जोरदार धडक, चौघे उडाले, मग… पुण्यातील थरारक VIDEO
अपघातात जखमी झाल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी हिवरखेड पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरोघात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच नोव्हेंबर रोजी सकाळी खामगाव सामान्य रुग्णालयात त्याच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर देऊळगाव घाट येथे दफन विधी करण्यात आला.
बुलढाण्यात अपघात वाढले, समृद्धीवरही अपघाताचे सत्र सुरुच
बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरू असताना आता शहरालगतच्या अंतर्गत रस्त्यांवर देखील सुसाट वाहन आणि त्यानंतर घडणारे अपघात आणि त्यात मृत्यूचे प्रमाण यात होणारी वाढ ही कुठेतरी चिंतेची बाब म्हणावी लागेल.
Buldhana Accident: बहिणीला सासरी सोडलं, घरी परतताना भावावर काळाचा घाला, ती भेट ठरली अखेरची
नवीन तयार झालेले रस्ते त्यावरचा सुसाट वेग रस्ते महामार्गाने दिलेले सूचना गतिरोधक घातक वळण याकडे होणारे दुर्लक्ष व सुसाट वेग त्यावर नसलेले नियंत्रण हे कुठेतरी या अपघातांना कारणीभूत ठरत आहे. अनेक वेळा नियंत्रित वेगावर आळा घाला, मनावर ताबा ठेवा, असे सूचनाफलक जागोजागी दिसतात. पण ते फक्त वाचण्यापुरतेच लक्षात ठेवून वाहनधारक आपला प्रवास करत असतात आणि त्यानंतर घडतात भीषण अपघात. त्यामुळे जनजागृती ही आपल्या मनजागृतीपर्यंत केल्यास असे अपघात टाळले जातील असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.