Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भाजपविरोधातील बंडखोरांना हाकललं, शिवसेनाविरोधातील बंडखोर पक्षातच, माजी खासदाराला भाजपचं अभय?

10

A T Patil : माजी खासदार ए. टी. पाटील आणि अमोल शिंदे यांच्यावर कारवाई न केल्याने त्यांना अभय तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.​

महाराष्ट्र टाइम्स

जळगाव : जळगावात पक्षाने जाहीर केलेल्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध बंडखोरी करीत उमेदवारी कायम ठेवणाऱ्या बंडखोर उमेदवारांवर भाजप व शिवसेना ठाकरे गटाकडून कारवाई करण्यात आली आहे. जळगाव शहरातील भाजपचे बंडखोर उमेदवार डॉ. अश्विन सोनवणे व मयूर कापसे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. मात्र, माजी खासदार ए. टी. पाटील आणि अमोल शिंदे यांच्यावर कारवाई न केल्याने त्यांना अभय तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटानेही जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने आणि माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. महायुती व महाआघाडीमध्ये अनेक ठिकाणी अधिकृत उमेदवार दिल्यानंतरही पक्षातील पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल करून ते माघारीनंतरही कायम ठेवले आहेत. या बंडखोरांवर पक्षाकडून आता कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

जळगाव शहरात भाजपकडून सुरेश भोळे यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. येथे भाजपचे माजी नगरसेवक डॉ. अश्विन सोनवणे व मयूर कापसे यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज कायम ठेवले आहेत. दरम्यान, दोन्हीही बंडखोर उमेदवारांनी पक्षाकडे आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे सादर केले होते. त्यानंतरही पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

शिवसेना ठाकरे गटाकडूनही पक्षाचे जिल्हाप्रमुख डॉ. हर्षल माने आणि जळगावचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी दिली. माने यांनी एरंडोल मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सतीश पाटील यांच्याविरोधात, तर कुलभूषण पाटील यांनी जळगाव शहर मतदारसंघातील उमेदवार जयश्री महाजन यांच्याविरुद्ध बंडखोरी केली आहे.

उमेदवारांकडून मनधरणी

जळगाव जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघांत महायुती व महाविकास आघाडीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. माघारीच्या मुदतीनंतरही या बंडखोरांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्याने मतविभाजन टाळण्यासाठी पक्षाच्या उमेदवारांकडून या बंडखोरांच्या जाहीर माघारीसाठी प्रयत्न केले जात आहेत.

भाजप, राष्ट्रवादी शरद पवार गट, अजित पवार गट, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटासह प्रमुख पक्षांमध्ये बंडखोरी झाली आहे. राजकीय पक्षांकडून बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, या कारवाईआधीच अनेक बंडखोर उमेदवारांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पक्षाच्या कुठल्याही कारवाईला बंडखोर जुमानत नसल्याने उमेदवारांच्या अडचणी वाढल्या आहेत.
BJP Rebel sacked : बंडखोरांची गय नाही, भाजपने ४० नेत्यांना पक्षातून हाकललं; भाजप उमेदवारा विरोधात शिंदेंच्या ‘जवळच्या माणसा’चं काय?
अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतरही काही बंडखोरांचे बंड शांत करून माघारीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. ठराविक अपक्ष उमेदवारांकडे यासाठी मनधरणी केली जात आहे. जळगाव शहर, अमळनेर, पाचोरा, एरंडोल व रावेर या मतदारसंघांत अनेकांनी बंडखोरी केल्यामुळे मतविभाजन होऊन विजयाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे. हे मतविभाजन टाळण्यासाठीच या अपक्ष उमेदवरांनी जाहीर माघार घेऊन आपणास पाठिंबा द्यावा यासाठी त्यांना विनंती केली जात आहे.

Jalgaon News : भाजपविरोधातील बंडखोरांना हाकललं, शिवसेनाविरोधातील बंडखोर पक्षातच, माजी खासदाराला भाजपचं अभय?

२०१९ च्या निवडणुकीतदेखील बंडखोर अपक्ष उमेदवारांना बऱ्यापैकी मते मिळाली होती. त्याचा धसका आता पक्षाच्या नेत्यांनीदेखील घेतला आहे. मागील निवडणुकीत भाजपच्या बंडखोरांनी पाचोरा, जळगाव ग्रामीण, चोपडा, एरंडोल या मतदारसंघांत बंडखोरी केली होती. काही ठिकाणी बंडखोर उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी बंडखोरांना जाहीर माघारीसाठी साकडे घालायला सुरुवात केली आहे.
Devendra Fadnavis : संघ कुठल्याही राजकीय पक्षासाठी उघड काम करत नाही, पण… देवेंद्र फडणवीसांनी पाच भेटींचं गूढ उकललं

पाटील, शिंदेंवर कारवाई नाही

भाजपाने पाचोरा व एरंडोल मतदारसंघांत शिवसेना शिंदे गटाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध बंड पुकारणाऱ्या अमोल शिंदे आणि माजी खासदार ए. टी. पाटील यांच्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्यांना पक्षाने अभय तर दिले नाही ना, अशी चर्चा सुरू आहे. दरम्यान, त्यांच्यावरील कारवाईबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, त्यांच्यावरही कारवाई केली जाणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी दिली.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.