Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कुटुंबप्रमुखांचा वचननामा, धारावी ते कोळीवाडा, मुलांनाही मोफत शिक्षण, ठाकरेंच्या जाहीरनाम्यात काय काय?

4

Shivsena Uddhav Thackeray Manifesto News: ”महाविकास आघाडीचा जाहीरनामा याच्याबाबत आम्ही पूर्णपणे सहमत आहोतच. पण शिवसेना म्हणून मला असं वाटतं की, आमचं देखील काही कर्तव्य आहे”.

हायलाइट्स:

  • कुटुंबप्रमुखांचा वचननामा, धारावी ते कोळीवाडा
  • मुलांनाही मोफत शिक्षण
  • ठाकरेंच्या जाहीरनाम्यात काय काय?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
उद्धव ठाकरे वचननामा

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीची पहिली संयुक्त सभा मुंबईतील बीकेसी येथे काल पार पडली असून महाविकास आघाडीचा जाहीरनामा काँग्रेस नेते राहुल गांधी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, शिवसेना युबीटी पक्षाचे उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातून मोठ्या घोषणा करण्यात आल्या असून महिलांना मोफत बससेवा देण्यात येणार आहे. तर, लाडक्या बहि‍णींना ३००० रुपये दरमहा देण्यात येतील. त्याचदरम्यान, शिवसेना (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी आपला वचननामा जाहीर केला आहे. या वचननाम्यात पाच ते सहा मुद्दे देण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपला वचननामा जाहीर केला, ते म्हणाले की, ”आजपर्यंत प्रत्येक निवडणुकीत महापालिका, महानगरपालिका, विधानसभा किंवा लोकसभा असेल. आम्ही बरीच वर्ष युतीमध्ये होतो. त्याच्यानंतर पाच वर्षांपासून आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. प्रत्येक निवडणुकीमध्ये युती असो किंवा आघाडी असो हा जाहीरनामा प्रसिद्ध होत असतो. पण शिवसेना हा पक्ष आघाडीमध्ये सामील असला तरी या पक्षाची एक स्वतंत्र वचनबद्धता आहे. मी मुद्दाम आठवण करु देऊ इच्छितो, की २०१२च्या निवडणुकीत शिवसेनेने वचननामा जाहीर केला होता, आणि त्यातील वचन देखील पक्षाने पूर्ण केले होते. याचा मला अभिमान आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
Satara News: ऐन निवडणुकीत साताऱ्यात राडा, कार्यकर्त्याच्या मोबाईल स्टेटसवरून घमासान, उमेदवारांमध्ये तू-तू, मैं-मैं; नेमकं काय घडलं?

”महाविकास आघाडीचा जाहीरनामा याच्याबाबत आम्ही पूर्णपणे सहमत आहोतच. पण शिवसेना म्हणून मला असं वाटतं की, आमचं देखील काही कर्तव्य आहे. काही गोष्टी बारीक-सारीक असतात, ते ढोबळपणाने मांडता येत नाहीत. आजचा जो वचननामा आहे तो तुमच्या साक्षीने महाराष्ट्रासमोर सादर करत आहे. हा वचननामा दोन स्वरुपात असेल. पहिला म्हणजे खिशात मावेल असा तो असेल. दुसरा म्हणजे पंचसुत्री असेल. खिशात मावेल असा पाच ते दहा वचनं त्यात आहेत. त्यावर क्यूआर कोड दिलेला आहे. तो स्कॅन केल्यानंतर तो वचननामा संपूर्णपणे वाचता येईल”, असं देखील ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं.

उद्धव ठाकरेंच्या वचननाम्यात काय काय?

१. धारावी पुनर्विकासाआडून बकालपणाचा सरकारचा डाव हाणून पाडणार.

२. मुंबई आणि महाराष्ट्रराचं नवे गृहनिर्माण धोरण ठरवणार.

३. कोळीवाड्यांचा क्लस्टर जीआर रद्द करणार.

४. राज्यातील बेरोजगारी हटवणार.

६. राज्यातील भूमिपूत्रांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करुन देणार.

७. मुलींप्रमाणे मुलांनांही मोफत शिक्षण देणार.

८.जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवणार.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.