Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शरद पवारांच्या शिलेदाराने बॉम्ब टाकला! माजी आमदार करणार भाजपच्या उमेदवाराचा प्रचार, काँग्रेसची डोकेदुखी वाढवली

9

Nandurbar Udesing Padvi Resign From NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून आता ते भाजप उमेदवार राजेश पाडवी यांचा प्रचार करणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

महेश पाटील, नंदुरबार : काँग्रेसचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब थोरात हेलिकॉप्टरने येत त्यांनी फक्त शहादा मतदारसंघातच बंडखोरी का थांबवली असा सवाल करत डील झाल्याची शंका उपस्थित करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी आमदार तथा माजी जिल्हाध्यक्ष उदेसिंग पाडवी यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासह ९१ पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. भाजपाचे आमदार राजेश पाडवी यांचा प्रचार करणार असल्याचे उदेसिंग पाडवी यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे तळोदा इथे आजी-माजी आमदार असलेल्या पिता-पुत्रांमधील अनेक वर्षांची कटूता दूर झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मात्र काँग्रेससाठी मोठी डोकेदुखी निर्माण झाली आहे.

बाळासाहेब थोरात हेलिकॉप्टरने नंदुरबारामध्ये आलेले

शहादा – तळोदा मतदारसंघासाठी महाआघाडीतर्फे काँग्रेसकडून भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन आलेले राजेंद्रकुमार गावित यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीला विरोध करत महाआघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेसने तिकिटासाठी तीन कोटी घेतल्याचा आरोप केला होता. या मतदारसंघात काँग्रेस तसंच राष्ट्रवादीतर्फे बंडखोरी झाली होती. मात्र अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते बाळासाहेब थोरात हे हेलिकॉप्टरने नंदुरबार येथे आले आणि बंडखोरांना अर्ज माघार घेण्यास सांगितलं, त्यानंतर बंडखोरांनी अर्ज मागे घेतला.
Nandurbar News : बाळासाहेब थोरात हेलिकॉप्टरने नंदुरबार शहरात, दोन तासात महाआघाडीच्या बंडखोरांचे अर्ज मागे

माजी आमदार उदेसिंग पाडवी यांचा आरोप

त्यामुळे महाविकास आघाडीमधील बिघाडी सुरळीत झाल्याची चर्चा सुरू होती. मात्र या चर्चेदरम्यानच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला. तसंच मतदार संघातील ९१ पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलं. आमदार उदेसिंग पाडवी यांनी सांगितलं की, जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. मात्र काँग्रेसचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी हेलिकॉप्टरने येऊन फक्त शहादा आणि नंदुरबार येथील बंडखोरी थांबवली. त्यांना इतर जागा दिसल्या नाही का? त्यामुळे याच्यात काहीतरी डील झाली असेल म्हणून बाळासाहेब थोरात आले, असा आरोप माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी केला आहे.
Solapur News : ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या घरासमोर शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, बार्शीत वातावरण तापलं, नेमकं काय घडलं?
आम्ही पक्षाचा राजीनामा दिला असून आता कुठल्या पक्षात जाणार नाही, तर ८ नोव्हेंबर पासून भाजपाचे आमदार राजेश पाडवी यांच्यासाठी प्रचार करणार असल्याचं सांगितलं. विविध ठिकाणी सभा घेणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. लोकसभेदरम्यान त्यांनी विविध सभा घेत गावित परिवारावर टीका केली होती. मात्र विधानसभेत गावित परिवारावर कुठलीही टीका करणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.
Donald Trump : अमेरिकेतून दरवर्षी १० लाख लोक बाहेर काढणार? अवैध स्थलांतरितांबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी तयारी

कट्टर विरोधक असलेले पिता – पुत्र एकत्र

शहादा विधानसभेत २०१४ मध्ये माजी मंत्री पद्माकर वळवी यांचा पराभव करत उदेसिंग पाडवी भाजपाकडून निवडून आले होते. मात्र २०१९ मध्ये त्यांचं तिकीट कापत त्यांचे पुत्र राजेश पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे उदेसिंग पाडवी यांनी भाजपाला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि नंदुरबार विधानसभेसाठी उमेदवारी मिळाली. त्यावेळी त्यांना मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला होता. उदेसिंग पाडवी हे एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक म्हणून गणले जातात. एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश झाला त्यावेळेस उदेसिंग पाडवी हेही राष्ट्रवादीमध्ये गेले.

शरद पवारांच्या शिलेदाराने बॉम्ब टाकला! माजी आमदार करणार भाजपच्या उमेदवाराचा प्रचार, काँग्रेसची डोकेदुखी वाढवली

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते शरद पवार यांच्यासोबत राहिले. लोकसभेत त्यांनी मोठ्या सभा घेत गावित परिवारावर शाब्दिक हल्ला चढवला होता. २०१९ पासून उदेसिंग पाडवी यांचा पुत्र आमदार राजेश पाडवी यांच्यासोबत वाद असल्याचं चित्र होतं. त्यामुळे तळोद्यात पिता – पुत्रांमध्ये कट्टर विरोधक म्हणून गणना होऊ लागली. मात्र आता मुलाच्या मदतीसाठी पिता धावून आले. आजी-माजी आमदार एकत्र आल्याने काँग्रेसची डोकेदुखी वाढणार आहे. बाळासाहेब थोरात यांनी बंडखोरी थांबवली असली, तरी अंतर्गत कलह मोठ्या प्रमाणात महाआघाडीमध्ये दिसत आहे.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.