Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बारामतीतील प्रतिष्ठेच्या लढतीत कोण ठरणार ‘गेमचेंजर’; कौटुंबिक कलहामुळे सामना बनला धारदार

8

Baramati Vidhan Sabha Big Fight: लोकसभेनंतर आता विधानसभेच्या निवडणूकीतही बारामतीत घरातच प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे. कौटुंबिक कलह विधानसभा प्रचारात दिसून येत असल्याने येथील निवडणूक धारदार बनली आहे.

Lipi

दीपक पडकर, बारामती : लोकसभेनंतर आता विधानसभेच्या निवडणूकीतही बारामतीत घरातच प्रतिष्ठेची लढत रंगणार आहे. लोकसभेवेळी उफाळून आलेला कौटुंबिक कलह विधानसभा प्रचारातही दिसून येत आहे. त्यामुळे बारामतीची निवडणूक यंदा कमालीची धारदार बनली आहे.

बारामती विधानसभेसाठी २३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पण खरी लढाई इथे महायुतीचे उमेदवार उपमुख्यमंत्री अजित पवार विरुद्ध त्यांचे पुतणे मविआचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्यात होत आहे. राष्ट्रवादीतील फूटीनंतर सुरुवातीला कौटुंबिक पातळीवर टीका टिप्पणी टाळली जात होती. परंतु लोकसभा आणि त्यानंतर आता विधानसभा निवडणूकीत कौटुंबिक बाबी चव्हाट्यावर आणल्या जात असल्याने ही निवडणूक कमालीची धारदार बनली आहे. ही निवडणूक राज्यात जितकी रंगतदार आणि अटीतटीची होईल त्यापेक्षा तिला असलेल्या कौटुंबिक किनारीचीच सध्या जास्त चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.
Sharad Pawar : भाजपच्या हातात सत्ता गेली आणि राज्य पहिल्यावरुन ६व्या क्रमांकावर, शरद पवारांचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
लोकसभेतील पराभव अजित पवार यांच्या जिव्हारी लागला. कच्चे दुवे साधत त्यांनी विधानसभेला त्यांनी पूर्ण ताकदीने लढाई सुरु केली. परंतु प्रचाराच्या पहिल्याच सभेत त्यांनी माझी आई नको म्हणत असताना माझ्याविरोधात घरातील उमेदवार दिला गेला. कोणी दिला तर साहेबांनी सांगितले. मग पवारसाहेबांनी आमचे घर फोडले का, असे सांगत आयतेच कोलीत शरद पवारांच्या हातात दिले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी घरातील वडीलधारी म्हणून मी नेहमीच कुटुंब एकसंघ ठेवण्याचा प्रयत्न केला. मला आई-वडील, भावांनी घरे फोडण्याची शिकवण दिली नाही, या शब्दांत अजित पवार यांना सणसणीत टोला लगावला.

मविआचे उमेदवार युगेंद्र यांचे वडील श्रीनिवास पवार, आई शर्मिला पवार हे दोघेही या वादात उतरले. श्रीनिवास यांनी माझी आई असे बोलूच शकत नाही असे सांगत अजित पवार यांचे म्हणणे खोडून काढले. तिला अजित जसा पुत्र म्हणून प्रिय तसा नातू म्हणून युगेंद्रही प्रिय असल्याचे सांगितले. तर शर्मिला यांनी राजकारणात आईंना ओढू नका, या शब्दांत सुनावले. त्यामुळे या निवडणूकीत कौटुंबिक कलह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. अजित पवार यांनी सोशल मिडियावरून त्यानंतर आईसोबतचे छायाचित्र प्रसिद्ध करत ‘मेरे पास माँ है’ असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रचाराची राळ मात्र कुटुंबातील कलहाने सुरु झाली.

बारामतीतील प्रतिष्ठेच्या लढतीत कोण ठरणार ‘गेमचेंजर’; कौटुंबिक कलहामुळे सामना बनला धारदार

आता निवडणूक प्रचाराला जोर आला आहे. बारामतीचे मैदान आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे स्थानिक नेतेच सांभाळत आहेत. अजित पवार हे राष्ट्रवादीचे नेते म्हणून राज्यभर प्रचारासाठी फिरत आहेत. शरद पवार यांना त्यांच्या पक्षासह मविआकडून प्रचारासाठी मोठी मागणी राज्यातून आहे. त्यामुळे सध्या तरी हे दोन्ही नेते बारामतीत नाहीत, ते आता थेट सांगता सभेलाच हजेरी लावतील, अशी चिन्हे आहेत. बारामतीच्या मैदानात आता आरोप-प्रत्यारोपांना जोर चढला आहे.

विजयी कोणीही झाले तरी एक पवारच बाजी मारणार

शरद पवार गटाकडून अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. तर बारामतीत केलेल्या विकासकामांवर अजित पवारांच्या पक्षाचे नेते मंडळी भर देत आहेत. शरद पवार यांनी एकाच दिवशी तालुक्यात सभा घेत अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील सहकारी संस्थांच्या संचालकांनाही थेट इशारा दिला आहे. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी, मला त्या रस्त्याने जायचे नाही, असे म्हणत शरद पवार यांनी गर्भित इशारा दिला आहे. एकूणच बारामतीतील काका-पुतण्याची लढाई कोणत्याही एकाच गटाच्या बाजूने झुकेल, अशी बिलकूल शक्यता उरलेली नाही. अजित पवारांनी केलेली विकासकामे असोत की शरद पवारांचे आजवरचे योगदान असो. दोन्ही गटांसाठी ही लढाई सोपी नाही. ती अटीतटीचीच होईल, यात शंका नाही. विजयी कोणीही झाले तरी इथल्या मैदानात कोणी तरी एक पवारच बाजी मारणार आहे.

दर निवडणूकीला बारामतीची लढाई एकतर्फी होत असते. विरोधकांचे डिपॉझिट जप्त होत असते. यंदा खचितच ती स्थिती बारामतीत नाही. जो विजयी होईल तो काठावरच्या मताधिक्यानेच होईल, अशी स्थिती सध्या इथे आहे. प्रचार अजून १० दिवस चालणार आहे. त्यात काय स्थित्यंतरे घडतात, यावर निवडणूक निकालाचे गणित अवलंबून असेल.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.