Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भाजपाला ‘हिरवा’ रंग नकोय, मुनगंटीवारांचा मात्र ‘भाईचारा’; मुस्लीम मेळाव्यातील रीलमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

5

Sudhir Mungantiwar at Muslim Melava in Chandrapur: भाजप आणि महायुतीत असलेले काही घटक पक्ष अधूनमधून मुस्लिम बांधवावर टीकाटिप्पणी करीत असतात. कधीकधी या टीकेचा दर्जा फारच खालविलेला असतो. आता विधानसभा निवडणूकीचा धुराळा उडाला असताना या परिस्थितीत एक मत लाखमोलाचे आहे. हे ओळखून भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाईचारा कायम ठेवल्याचे बोलले जात आहे.

Lipi

चंद्रपूर : भाजप आणि महायुतीत असलेले काही घटक पक्ष अधूनमधून मुस्लीम बांधवावर टीकाटिप्पणी करीत असतात. कधीकधी या टीकेचा दर्जा फारच खालविलेला असतो. आता विधानसभा निवडणूकीचा धुराळा उडाला असताना या परिस्थितीत एक मत लाखमोलाचे आहे. देश पातळीवर भाजप आणि महायुतीचे काही घटक पक्ष मुस्लिम समाजावर नको ती टिप्पणी करीत असले तरी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाईचारा कायम ठेवला आहे. बल्हारपूर येथे मुनगंटीवार यांनी मुस्लिम महिला मेळाव्यात हजेरी लावली. यावेळी ते म्हणाले, हिंदू, मुस्लिम शिख, इसाई , आग लगती है काँग्रेस आई तो. मी जात, धर्म कधीच बघितला नाही. माझे कार्य माणसांसाठी आहे. मुनगंटीवार यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर या मेळाव्याचे रील टाकण्यात आले आहेत. मुनगंटीवार यांचा हा भाईचारा भाजपशी संलग्नित असलेल्या कट्टर हिंदूत्ववादी संघटनाना किती पचणी पडेल ? हे पाहणे उस्तुकतेचे ठरणार आहे.

लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात मुस्लिम मतदारांनी महाविकास आघाडीचा विजयाला हातभार लावला होता. काँग्रेसकडे त्यांचा कल असतो. तर दुसऱ्या आघाडीकडून देशातील मुस्लिम बांधवावर नको ते वक्तव्य करण्यात येत आहे. ही टीका करण्यात भाजपचे काही खासदार, आमदार आणि भाजपशी संलग्नित संघटना आघाडीवर असतात. नितेश राणे यांनी प्रक्षोभक भाषण करून मुस्लीम समाजाला धमकावले सुद्धा आहे. राज्यातील काही मतदारसंघात मुस्लिम मतदारांचा प्रभाव आहे, अशा मतदारसंघात त्यांची भूमिका निर्णायक ठरते. लोकसभेमध्ये बसलेला फटका पाहता भाजपने आता नमती भूमिका घेतल्याचे दिसत आहे. मुस्लिम मतदारांची शक्ती भाजपला कळली. त्याचमुळे मुस्लिम बांधवावर, त्यांचा श्रद्धास्थानावर आणि मुस्लिमांना पुढे करून काँग्रेसवर आगपाखड करणारे भाजप नेते आता मतासाठी हात जोडू लागल्याचे चित्र दिसत आहे. त्याची झलक चंद्रपुरात आज दिसली आहे.
शरद पवारांच्या शिलेदाराने बॉम्ब टाकला! माजी आमदार करणार भाजपच्या उमेदवाराचा प्रचार, काँग्रेसची डोकेदुखी वाढवली
खरंतर मुनगंटीवार यांनी जाती, धर्माचा पलीकडे जाऊन राजकारण केलं, असं चित्र असताना आता चर्चा होतेय ती त्यांच्या फेसबुक पेजवर टाकलेल्या रिलची. मुनगंटीवार बल्हारपूर मतदारसंघातून उभे आहेत. त्यांचा प्रचार जोरात सुरु आहे. बल्हारपूर येथे झालेल्या मुस्लिम महिला मेळाव्याला त्यांनी हजेरी लावली. महिलांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसला चिमटे काढले आहेत. मात्र मुनगंटीवार यांच्या भाईचाऱ्याची चर्चा रंगली आहे. त्यांचा हा भाईचारा भाजपचा नेत्यांना किती रुचणार? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

विमल पाटील

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.