Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
बड्या राजकीय नेत्याची २५ लाखांची रोकड जप्त; रोकड सापडलेली व्यक्ती एका राजकीय उमेदवाराच्या शाळेतील क्लार्क
Maharashtra Election 2024: जळगावमधील शनिपेठ पोलिसांनी एका व्यक्तीकडून २५ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही व्यक्ती एका उमेदवाराच्या शिक्षण संस्थेत क्लार्क असल्याची चर्चा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार जळगाव शहरातील शनिपेठ पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान एका व्यक्तीकडून २५ लाख रुपयांची रोकड जप्त केली या रोकड संदर्भात संबंधित व्यक्तीने माहिती न दिल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले हा व्यक्ती सदर एका बॅगमध्ये २५ लाखाची रोकड घेऊन जात होता. पोलिसांना गुपित माहितीच्या आधारे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले त्याला बोहरा गल्लीमध्ये पकडण्यात आले.
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर दगडफेक; नांदेडमधील कंधार तालुक्यातील बाचोटी गावातील प्रकार
प्रमोद हिरामण पवार (वय ५१, रा तामसवाडी ता पारोळा) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 500, 200 तसेच 100च्या नोटांची सुमारे २५ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. ही रोकड तो एका निळ्या रंगाच्या हॅन्डबॅग मध्ये घेऊन जात होता. जळगाव शहरातील बोहरा गल्ली परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या पथकांनी त्याला अडवले बॅगेत काय आहे? अशी विचारणा केल्यावर त्याने मी शेतकरी आहे व माझ्याकडे खूप शेती आहे, आणि मी नोकरीला देखील आहे. त्यामुळे आज सोन्याचा भाव कमी झाला असल्याने मी सोने घ्यायला आलेलो होतो असे कारण सांगितले.
US President: डोनाल्ड ट्रम्प यांना किती पगार मिळणार? अमेरिकेचे नवे अध्यक्षांची एकूण संपत्ती किती?
परंतु सदर व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली वाटू लागल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन शनिपेठ पोलीस ठाण्यात आणलं प्रमोद पवार या व्यक्तीची सखोल चौकशी सुरू आहे. त्याने एवढी रक्कम कुठून आणली ही रक्कम तो कुठे घेऊन जात होता. या संदर्भातील माहिती घेण्याचं काम सुरू असल्याची माहिती शनिपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांनी दिली. दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या काळात मोठी रक्कम बाळगण्यास प्रतिबंध असल्याने या कारवाईची माहिती शनिपेठ पोलिसांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या असलेल्या भरारी पथकाला दिले हे रोकड याच पथकाकडे देण्यात येणार असल्याचे रंगनाथ धारबळे यांनी सांगितले.
जप्त केलेली २५ लाखांची रोकड जिल्ह्यातील एका राजकीय उमेदवार नेत्याची?
प्रमोद पवार यांच्याकडून 25 लाखाची रोकड सापडली असल्याने ही रोकड जिल्ह्यातील एका राजकीय बड्या नेत्याची असल्याची चर्चा सुरू आहे प्रमोद पवार हा पारोळा तालुक्यातील ना.शी मंडळ या शैक्षणिक संस्थेत क्लर्क देखील आहे, ही जी संस्था आहे ती एका राजकीय नेत्याची संस्था असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही रोखून नेमकी कोणत्या नेत्याची आहे याची कसून चौकशी पोलीस करीत आहे.