Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
उमेदवारांच्या खर्चावर आयोगाचा ‘वॉच’; मतदानाच्या दिवसापर्यंत उमेदवारांना ३ वेळा सादर करावा लागणार हिशेब
Maharashtra Assembly Election 2024: शहरातील तीनही मतदारसंघांमधील उमेदवारांच्या खर्च तपासणीला गुरुवार (दि. ७) पासून, तर देवळालीतील खर्च तपासणीला उद्या (दि. ८) पासून सुरुवात होणार आहे.
हायलाइट्स:
- ७, १२ व १७ नोव्हेंबर रोजी खर्चाची तपासणी
- उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहणे गरजेचे
- मूळ कागदपत्रांची होणार तपासणी
Chhatrapati Sambhajinagar: गर्लफ्रेण्डसोबत पळाला, मग खुनी खेळ, या बॉयफ्रेण्डचा कारनामा पाहून पोलीसही हादरले
देवळाली मतदारसंघात उद्या खर्च तपासणीदेवळाली विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाच्या तपासणीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ८, १३ व १८ नोव्हेंबर रोजी उमेदवारांच्या खर्चाची तपासणी करण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत शासकीय विश्रामगृह येथे ही तपासणी होणार आहे.