Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nostradamus prediction On Donald Trump : नॉस्ट्राडेमसची भविष्यवाणी ठरली खरी! अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्पचे वर्चस्व, जाणून घ्या भारताबद्दल नॉस्ट्राडेमसचे ४ अंदाज
nostradamus 4 major predictions about india : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेत आले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचा पराभव करुन ट्रम्प पुन्हा विजयी झाले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने सर्व राजकीय चर्चेदरम्यान, नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाण्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नॉस्ट्राडेमसचे कोणते भाकित ट्रम्प यांच्याशी जोडले जात आहेत. नॉस्ट्राडेमसने भारतासाठी कोणते मोठे भाकीत केले आहेत ते पाहूया.
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेत आले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचा पराभव करुन ट्रम्प पुन्हा विजयी झाले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने सर्व राजकीय चर्चेदरम्यान, नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाण्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
महान फ्रेंच ज्योतिष नॉस्ट्राडेमसने शतकानुशतके वर्तवलेली भविष्यवाणी अमेरिकेच्या राजकारणाशी जोडला जात आहे. १५५५ मध्ये नॉस्ट्राडेमसचे ‘द प्रोफेसीज’ (लेस प्रोफेटीज) नावाचे पुस्तक प्रकाशित झाले, जे नॉस्ट्राडेमसने १५०३ च्या आसपास लिहिले होते.
या पुस्तकात भारतासह देश आणि जगाबाबत अनेक भाकिते करण्यात आली होती. त्यांचे अनेक अंदाज खरेही ठरले आहेत. नॉस्ट्राडेमसचे कोणते भाकित ट्रम्प यांच्याशी जोडले जात आहेत. नॉस्ट्राडेमसने भारतासाठी कोणते मोठे भाकीत केले आहेत ते पाहूया.
नॉस्ट्राडेमसच्या भाकिताचा संबंध ट्रम्पशी का जोडला जात आहे?
नॉस्ट्राडेमसने ‘द प्रोफेसीज’ या पुस्तकात जगातील महासत्तेचा उल्लेख केला आहे. या पुस्तकानुसार महासत्तेचा नवा राजा आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर दुसऱ्यांदा सिंहासनावर विराजमान होणार आहे. अमेरिका १५५५ मध्ये देश म्हणून तयार झाला नव्हता. अमेरिकेची स्थापना १७७६ मध्ये झाली होती. नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीत या देशाला महासत्ता नमूद करण्यात आली आहे. सध्याच्या काळात अमेरिका महासत्ता देशांपैकी एक आहे. तसेच अमेरिकेत नुकत्याच निवडणुकाही झाल्या, ज्यामध्ये ट्रम्प यांचे वय सध्या ७८ वर्षे आहे. अशात नॉस्ट्राडेमसने शतकांपूर्वी केलेल्या भाकितांमध्ये अमेरिकन निवडणूका आणि ट्रम्प यांच्या विजय दिसून आला.
भारतात योद्धा जन्माला येईल
नॉस्ट्रॅडॅमसने आपल्या भविष्यवाण्यांच्या पुस्तकात भौगोलिक संकेत देताना भारताविषयीही देखील म्हटले आहे. या भविष्यवाणीनुसार भारतासाठी तारणहार जन्माला येईल. जो केवळ राजकारणातच नाही तर धर्माच्या क्षेत्रातही सक्रिय राहून अनेक मोठी कामे करेल. त्या तारणहाराच्या सान्निध्यात वंचित वर्गातील लोकांच्या समस्या दूर होतील आणि अनेक मोठी संकटे टळू शकतील.
तिसऱ्या महायुद्धात भारत संघर्ष करेल
नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाणीनुसार संपूर्ण जगाला तिसऱ्या महायुद्धाचा सामना करावा लागणार आहे. जगातील अनेक देशांमध्ये तिसऱ्या महायुद्धामुळे परिस्थिती बिघडेल. या महायुद्धात अनेक महासत्ता सहभागी होतील. त्यात भारताला देखील संघर्ष करावा लागणार आहे.
धर्मात फूट आणि अराजकता निर्माण होईल
नॉस्ट्रॅडॅमसने आपल्या भविष्यवाणीत अनेक धर्म असलेल्या देशाबद्दल सांगितले आहे. या अंदाजानुसार भारतात अनेक धर्माचे लोक राहातात. तसेच भारतात धर्माच्यावरुन राजकीय हिंसक स्वरुप देखील पाहायला मिळते. अनेकवेळा धर्मावरुन दंगली घडताना दिसल्या आहेत. इंटरनेटच्या वाढत्या काळामुळे लोक एकत्र येण्याऐवजी त्यांच्यात फूट पडण्यास सुरुवात झाली आहे. नॉस्ट्राडेमसच्या अंदाजानुसार भविष्यात आणखी भयंकर परिणाम दिसू शकतात.
देशाचे हवामान बिघडेल
नॉस्ट्राडेमसने आपल्या भविष्यवाणीत असे देखील म्हटले आहे की, जगातील असा प्राचीन देश वेगवेगळ्या ऋतूंसाठी प्रसिद्ध आहे. जिथे पवित्र नद्या वाहतात तिथे हवामानाचा समतोल बिघडतो. तसेच उष्णता इतकी वाढेल की, पृथ्वी गरम होईल. थंडी वाढेल. ऋतूनुसार चक्र बिघडेल. नॉस्ट्रॅडॅमसचे भाकीत कितपत खरे ठरतील हे केवळ काळच सांगेल कारण भविष्यवाण्यांबद्दल स्पष्टपणे काहीही सांगता येत नाही. विविध घटनांना विशिष्ट संकेतांशी जोडूनच अंदाज जोडले जातात.