Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

योगींचे चार भाऊ ४० वर्षात एकत्र आले नाहीत, वडिलांच्या अंत्यविधींना गैरहजर, तिथेही बटेंगे: राऊत

5

Sanjay Raut on Batenge to Katenge : सत्तेसाठी आणि निवडणुकीसाठी भाजपला बटेंगे तो कटेंगेच्या घोषणा द्याव्या लागत आहेत, हे दुर्दैव असल्याचंही यावेळी संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा ‘बटेंगे तो कटेंगे’चा नारा किंवा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अगर हम बटेंगे तो…’ असं म्हणत ट्वीट केलेल्या व्हिडिओवरुन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल चढवला. योगी आदित्यनाथ यांना चार भाऊ आहेत आणि गेल्या ४० वर्षात चार भाऊ एकत्र आलेले नाहीत, असं म्हणत राऊतांनी त्यांचा समाचार घेतला. सत्तेसाठी आणि निवडणुकीसाठी भाजपला बटेंगे तो कटेंगेच्या घोषणा द्याव्या लागत आहेत, हे दुर्दैव असल्याचंही यावेळी संजय राऊत म्हणाले. ते सकाळी पत्रकार परिषदेत बोलत होते.

संजय राऊत काय म्हणाले?

देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटमध्ये ‘बटेंगे तो…’च्या पुढचं सांगायला पाहिजे. त्यांनी आमचा पक्ष वाटला – बटेंगे… राष्ट्रवादी काँग्रेस वाटला – बटेंगे… भविष्यात सत्ता गेल्यावर हीच वेळ त्यांच्यावरही येणार आहे. बटेंगे.. झुकेंगे.. नष्ट होंगे हे त्यांचं प्राक्तन आहे, पक्षाचं भविष्य आहे, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
Milind Deora : ठाकरे पितापुत्राचं राजकारण नकारात्मक, उद्धवजींचा दुराग्रह राज्यास मारक, मिलिंद देवरा यांचा हल्लाबोल

योगींचे चार भाऊ ४० वर्षात एकत्र आले नाहीत

योगी आदित्यनाथ यांच्या संदर्भात बटेंगे तो कटेंगे असे पोस्टर मुंबईत लावले जात आहेत, याचं मला आश्चर्य वाटतं. कारण योगी आदित्यनाथ यांना चार भाऊ आहेत आणि गेल्या ४० वर्षात चार भाऊ एकत्र आलेले नाहीत. अनेक वर्ष योगी आपल्या आईला भेटू शकले नाहीत.. तिथेही बटेंगे. योगी आपल्या वडिलांच्या अंत्ययात्रेला जाऊ शकले नाहीत… तिथेही बटेंगे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

Sanjay Raut : योगींना चार भाऊ पण ४० वर्षात एकत्र आले नाहीत, वडिलांच्या अंत्यविधींना गेले नाहीत, तिथेही बटेंगे; संजय राऊत यांचा हल्लाबोल

Mumbai MLAs Wealth : टॉप 10 श्रीमंत आमदारांमध्ये भाजपचे 5, शाह 3400 कोटींचे मालक, आव्हाडांची निव्वळ मालमत्ता 624 टक्क्यांनी घटली

निवडणुकीसाठी बटेंगे तो कटेंगेच्या घोषणा

हे स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून आम्हाला बटेंगे-कटेंगे-छटेंगे आम्हाला शिकवतात. ज्या भाजपने आयु्ष्यभर देशात बटेंगेचं राजकारण केलं, त्यांना आता सत्तेसाठी, निवडणुकीसाठी बटेंगे तो कटेंगेच्या घोषणा द्याव्या लागत आहेत, हे दुर्दैव आहे. आम्ही राष्ट्र, समाज एकत्र ठेवण्यासाठी संघर्ष करतोय आणि ते बटेंगे तो कटेंगेची भाषा करत आहेत हे दुर्दैव असल्याचंही संजय राऊत म्हणाले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.