Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

माझे मित्र देवेंद्र फडणवीस, मोदींची मराठीत सुरुवात; मविआ विकास ठप्प करणारी आघाडी असल्याची टीका

4

Narendra Modi Dhule Sabha Highlights for Vidhan Sabha Election :आचारसंहिता संपून जसे महायुतीचे सरकार स्थापन होईल, तसे मी वाढवण बंदरासह विमानतळाबाबत देवेंद्र फडणवीस यांची इच्छा कशी पूर्ण होते, त्यावर एकत्र बसून निर्णय घेऊ, असंही नरेंद्र मोदी म्हणाले

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
नरेंद्र मोदी धुळे भाषण

अजय गद्रे, धुळे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धुळ्यात जाहीर सभा होत आहे. यावेळी मोदींनी मराठीत भाषणाला सुरुवात केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख माझे मित्र असा केला. आचारसंहिता संपून जसे महायुतीचे सरकार स्थापन होईल, तसे मी वाढवण बंदरासह विमानतळाबाबत देवेंद्र फडणवीस यांची इच्छा कशी पूर्ण होते, त्यावर एकत्र बसून निर्णय घेऊ, असंही नरेंद्र मोदी म्हणाले. लाडकी बहीण योजनेची चर्चा देशभरात असून विरोधक मात्र तिच्याविरुद्ध कोर्टात गेल्याचं मोदी म्हणाले.

नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

– लोकांना लुटणारे महाविकास आघाडीचे लोक, धोक्याने बनलेल्या सरकारची अडीच वर्ष पाहिली आहेत, आधी सरकार लुटले आणि शेवटी लोकांना लुटायला लागले होते.
– आघाडी सत्तेत आल्यावर मेट्रो, महामार्गांसारख्या विकास कामांना खीळ बसली, त्या सर्व योजना थांबावल्या ज्याने राज्याचे भविष्यात उज्ज्वल होणार होते
– युतीने विकासाचे नवे आयाम उभे केले, विकासाचा भरोसा मिळवला आहे.
– लक्षात ठेवा, भाजप, महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे.
– महिलांना केंद्रस्थानी ठेवून महायुतीचे अनेक निर्णय
– महाविकास आघाडीने महिला विकासाच्या अनेक संधी रोखल्या
– महायुतीच्या १० संकल्पांची सर्वत्र चर्चा सुरु आहे
– महाराष्ट्र पोलिसात २५ हजार मुलींची भरती
– युतीच्या वचननाम्याची चर्चा होत आहे, शानदार वचन नामा, विकासाची वाढेल गती, महाराष्ट्राची होणार हमाखास प्रगती.
– प्रत्येक वर्गाच्या प्रगतीची योजना आहे, सुरक्षेचा एहसास आहे, सर्वाना सोबत घेऊन चालण्याचा विश्वास आहे.
– युतीचा वचन नामा विकसित भारताचा आधार बनेल.
– महिला पुढे जातात तेव्हा संपूर्ण समाज गतीने विकास करतो
– केंद्र सरकारने महिलांसाठी मोठे निर्णय घेतले.
– जास्तीत जास्त क्षेत्रात महिलांना रोजगारच्या संधी दिली.
– केंद्राच्या प्रत्येक योजनेच्या केंद्रस्थानी महिला आहेत.
– युती सरकार केंद्राप्रमाणे महिला सशक्तीकरणाचे काम करीत आहे.
– महाराष्ट्र पोलीसमध्ये 25 हजार महिला भरतीमुळे महिला सामर्थ्य वाढेल, सुरक्षा वाढेल, रोजगार मिळेल.
– महिलांसाठी युतीची कामं आघाडीला सहन होत नाहीत
– लाडकी बहीण योजनेची चर्चा संपूर्ण देशात आहे. पण काँग्रेस ही योजना बंद करण्यासाठी षडयंत्र रचत आहेत, या योजनेच्या विरोधात कोर्टात गेले. ही योजना बंद करण्याचा डाव.
– आघाडीपासुन सतर्क राहण्याचे आवाहन, ते महिला सशक्तीकरण पाहू शकत नाहीत.
– महिलांबाबत चुकीच्या भाषेचा वापर केला जात आहे, याला जनता माफ करणार नाही
– मातृभाषा आई असते, गर्व आहे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
– या निर्णयानंतर संपूर्ण जगातून मराठी लोकांचे संदेश येत आहेत.
– लोक या निर्णयामुळे खुश आहेत, हे स्वप्न भाजपाने पूर्ण केले आहे
– भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा आनंद, काँग्रेसने देशात राज्यात केंद्रत सरकार होते पण मराठीला अभिजात भाषाला केली नाही, मराठीकडे दुर्लक्ष केले, आता विरोधकांना पुन्हा जळफळाट होत आहे, मोदींनी हे काम केलं?

मालेगाव रोडवरील खान्देश गोशाळेच्या मैदानावर दुपारी बारा वाजता मोदींची सभा झाली. राज्यातील विधानसभेच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांची धुळ्यातील पहिलीच सभा होती. या सभेसाठी ७० हजार नागरिकांची बैठक व्यवस्था असलेल्या भव्य मंडपाची उभारणी करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री गिरीश महाजन, डॉ. सुभाष भामरे, अमरिश पटेल, राजवर्धन कदमबांडे, धुळे ग्रामीणमधील भाजप उमेदवार राम भदाणे, गजेंद्र अंपळकर, चंद्रकांत सोनार, अरविंद जाधव, हिरामण गवळी, शीतलकुमार नवले आदी उपस्थित राहणार आहेत. भाजपचे धुळ्याचे उमेदवार अनुप अग्रवाल यांनी ही माहिती दिली.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.