Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nana Patole: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावरुन राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
महायुती सरकारच्या काळातील राज्यातील परिस्थितीवर भाष्य करताना पटोलेंनी बदलापूरमधील घटनेचा उल्लेख केला. त्या शाळेत ब्ल्यू फिल्म तयार केल्या जायच्या, अवयव विक्रीचं काम चालायचं असा गंभीर आरोप पटोलेंनी केला. ‘ही शाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे. या शाळेत लहान मुलींच्या अश्लील चित्रफिती तयार करण्याचे, अवयवांची विक्री करण्याचे उद्योग सुरु होते,’ असा आरोपी पटोलेंनी केला. ती शाळा आरएसएसशी संबंधित असल्यानंच सरकारनं या शाळेवर मेहेरबानी केली, असं पटोले पुढे म्हणाले.
आणखी एका राज्यात खोक्यांवरुन राडा; CMकडून CID चौकशीचे आदेश, कारण ठरले समोसे; प्रशासनात खळबळ
बदलापूरात चार-पाच वर्षांच्या मुलींवर अत्याचार झाले. दोनच नव्हे, तर असंख्य मुलींवर अत्याचार झाले. न्यायालयानं चौकशीचे आदेशदेखील दिले. पण शाळा आरएसएसशी संबंधित असल्यानं राज्य सरकारनं त्यांच्या संचालक मंडळावर कारवाई केली नाही. माहितीच्या अधिकारातून एका व्यक्तीनं मागितली. त्या शाळेत ब्ल्यू फिल्म फिल्म, पिक्चर तयार करण्याचं, शरीराचे अवयव विकण्याशी संबंधित एक जनहित याचिका करण्यात आली आहे, असं पटोले नांदेडमधील भाषणात म्हणाले.
एकमेका सहाय्य करु, दोघे गाठू विधानसभा? ठाकरेंच्या समझोत्याची चर्चा; माहीम, वरळीत चाललंय काय?
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण ऑगस्टमध्ये उघडकीस आलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेविरोधात न्यायालयात खटला सुरु होता. पण २३ सप्टेंबरला एका दुसऱ्या गुन्ह्यात त्याला तळोजा कारागृहातून नेण्यात येत होतं. त्याचवेळी मुंब्रा बायपासजवळ अक्षय शिंदेनं पोलिसांची बंदूक खेचली आणि गोळीबार केला. त्यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात शिंदेचा मृत्यू झाला.
पोलिसांनी केलेल्या एन्काऊंटरवर मुंबई उच्च न्यायालयानानं अनेक प्रश्न उपस्थित केले. अक्षय शिंदेनं पोलिसांकडून बंदूक खेचली कशी, त्यावेळी पोलिसांच्या वाहनातील सगळे पोलीस काय करत होते, पोलिसांना शिंदेला का आवरता आलं नाही, त्यानं बंदूक अनलॉक कशी काय केली, पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी का झाडली नाही, अशी प्रश्नांची सरबत्तीच न्यायालयानं पोलिसांवर केली.