Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Uran Eknath Shinde Office Bearers Resign: उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. आता योग्यवेळी योग्य भूमिका घेणार असल्याचं पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. सामूहिक राजीनाम्यानंतर वरिष्ठांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Pune News : संभाजीराजे छत्रपती यांचे सुपुत्र निवडणुकीच्या रिंगणात, तिसऱ्या आघाडीसाठी करणार प्रचार
एकतर्फी आणि मनमानी कारभार, पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर, कार्यकर्त्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत आणि सामूहिक राजीनामे देण्याबाबत उलवे हॉटेल स्वाद येथे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जेष्ठ नेते कृष्णा.बा. पाटील यांनी रुपेश पाटील यांच्या एकतर्फी आणि मनमानी कारभाराला कंटाळून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सामूहिक राजीनामे देत असल्याचं सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजनितीला बदनाम करणाची कृती
आम्ही उरण विधानसभा मतदारसंघात शिवसेना प्रदेश सचिव संजय मोरे साहेब, यांच्या सुचनेनुसार रायगड जिल्हा सल्लागार मा. रमेश गुडेकर यांच्या विश्वासू मध्यस्थीने आणि त्या वेळचे जिल्हा प्रमुख आमदार महेंद्र थोरवे यांच्या खास उपस्थितीने कार्यरत झालो. गेली दोन वर्ष आम्ही सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक युवासेना नेते रूपेश पाटील यांच्या येथील भयानक राजनीतीने बाधीत होतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजनितीला बदनाम करणारी प्रत्येक कृती येथे ते करत आहेत. वरिष्ठ पातळीवर पाटील यांच्या संघटनेला बाधक आणि विनाशकारी ठरणाऱ्या कृतीबाबत नेक वेळा तक्रार करुनदेखील दखल घेतली जात नसल्यामुळे आम्ही शिवसेनेचा आणि शिवसेना पदांचा सामूहिकरित्या राजिनामा देत आहोत, असं कृष्णा पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.
दोन वेळा मुख्यमंत्री पद भोगलं, तरी काँग्रेसला शिव्या; ‘अशोक चव्हाणांचा सातबारा खोडून काढण्याची वेळ,’ नाना पटोले कडाडले
शिंदे गटाच्या या राजीनामामुळे महायुतीचे उमेदवारांना मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिंदे गटाचे सामूहिक राजीनामे हे शिवसेनेला देखील एक मोठा धक्का मानला जात आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याने त्यांनी राजीनामा दिलेले असले, तरी पक्षाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Raigad News : निवडणुकीच्या प्रचारात राजकीय भूकंप; एकतर्फी, मनमानी कारभाराला कंटाळून शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
सामूहिक राजीनामा देणारे पदाधिकारी
यामध्ये कृष्णा बा. पाटील जेष्ठ नेते, राजन श. म्हात्रे – संपर्क प्रमुख उलवे, भरत देशमुख – उलवे शहर प्रमुख, अमित कमळाकर ठाकूर उपतालुका प्रमुख उरण तालूका, प्रभाकर पाटील – विभागीय प्रमुख गव्हाण (उलवे), विजय पाटील विभाग प्रमुख चिरनेर, सचिन पाटील समन्वयक उरण तालुका, अनंता गडकरी शाखा प्रमुख बामण डोंगरी, संतोष मोकल शाखा प्रमुख तरघर, सचिन देशमुख शाखा प्रमुख खारकोपर, ज्ञानेश्वर पाटील शाखा प्रमुख मोरावे, रामदास पाटील संघटक वहाळ ग्रामपंचायत, धनंजय कोळी मोहा शाखा प्रमुख, अतिष ठाकूर शाखा प्रमुख उलवे सेक्टर १९, प्रसाद पाटील शाखा प्रमुख उलवे सेक्टर ५/६, सुरेंद्र ठाकूर जसखार शाखा प्रमुख यांचा समावेश आहे. या सर्वांनी आपल्या पदाचा सामूहिक राजीनामा दिला आहे.