Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शिवसेना उबाठानं सांगलीतील तासगावात वेगळीच भूमिका घेतली आहे. पक्षानं महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देत महाविकास आघा़डीच्या उमेदवारास ठाम विरोध केला आहे.
तासगाव-कवठेमहाकाळ विधानसभा मतदारसंघातून दिवंगत माजी गृहमंत्री, उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील निवडणूक लढत आहेत. ते शरद पवारांच्या पक्षातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या समोर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून माजी खासदार संजय काका पाटील रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीत संजय काका पाटील भाजपकडून लढले. त्यांचा विशाल पाटील यांनी पराभव केला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी भाजपला रामराम करत अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला.
Sunetra Pawar: तरुणाची दादांकडे खास मागणी; पोस्टर पाहताच सुनेत्रा पवारांची पावलं थांबली; गोड हसत फोटो काढला
लोकसभेला सांगलीची जागा महाविकास आघाडीत ठाकरेसेनेला सुटली होती. पण काँग्रेसच्या विशाल पाटलांनी बंडखोरी करत सरशी साधली. त्यामुळे ठाकरेसेनेचा पराभव केला. त्याचा बदला घेण्यासाठी आता तालुक्यातील ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट विरोधकांशी हातमिळवणी केली आहे. अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार संजय काका पाटील यांना बिनशर्त पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे रोहित पाटील यांच्या अडचणीत भर पडली आहे.
ठाकरेसेनेचे तालुकाप्रमुख प्रदीप माने विधानसभा निवडणूक लढण्यास उत्सुक होते. त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता. पण त्यानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला. आता त्यांनी थेट संजय काका पाटलांना पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मतदारसंघात झटका बसला आहे. माने यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत नेमकं चाललंय काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काजू खाल्ले चार, खर्च झाला फार; कॅमेऱ्याची नजर भाजप आमदाराला महागात; प्रचारात भन्नाट किस्सा
तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला कट्टरपणे विरोध करुन हा उमेदवार निवडून येणार नाही याची दक्षता घेऊ, अशी भूमिका मानेंनी घेतली आहे. आमच्या विरोधात काहीही कारवाई केली, तरीही कट्टर शिवसैनिक म्हणून सहन करण्यास तयार आहोत. उद्धव ठाकरेंचा बदला घेण्यासाठी सगळ्या शिवसैनिकांनी एकजूट केलेली आहे. या मतदारसंघात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार संजयकाका पाटील यांना बिनशर्त पाठिंबा देऊन टाकलेला आहे, असं माने यांनी जाहीर केलं.