Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सुनेत्रा पवारांना अटक ते राष्ट्रवादी का फुटली? छगन भुजबळांच्या दाव्याने राजकारण हादरलं

3

Chhagan Bhujbal Book Interview: राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरुय. याच निवडणुकीच्या धामधुमीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी एका पुस्तकात केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

हायलाइट्स:

  • सुनेत्रा पवारांना अटक ते राष्ट्रवादी का फुटली?
  • छगन भुजबळांच्या दाव्याने राजकारण हादरलं
  • राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात महत्त्वाचे खुलासे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
छगन भुजबळ राजदीप सरदेसाई पुस्तक

नाशिक : राजकारणात अनेक पुस्तके लक्षवेधी ठरतात. त्यावरुन वादविवाद आणि चर्चाही झडत राहतात. असेच एक वाद आणि चर्चेला तोंड फोडणारं पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. हा जणू एक पुस्तक बॉम्बच असेल. पान क्र.२४३ वर या पुस्तकात असेच गौप्यस्फोट करण्यात आलेले आहेत. या पुस्तकात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी केलेल्या गौप्यस्फोटांनी राजकारण अक्षरश: हादरण्याची शक्यता आहे. भाजपसोबत महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा एकच अर्थ म्हणजे ईडीपासून सुटका, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ओबीसी असल्यामुळेच माझ्यावर ईडीची कारवाई झाली, असे अनेक प्रकारचे खुलासे भुजबळ यांनी केले आहेत. राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरुय. याच निवडणुकीच्या धामधुमीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी एका पुस्तकात केलेल्या दाव्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकातील छगन भुजबळ यांच्या एका मुलाखतीवरुन राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. ईडीच्या भीतीमुळेच सरकारमध्ये सहभागी झाल्याचं छगन भुजबळ यांनी पुस्तकात कथन केलं आहे. तसेच सुनेत्रा पवारांच्या अटकेच्या शक्यतेने अजित पवारांना घाम फुटला होता, असा दावाही या पुस्तकात केला आहे.
Mumbai MLAs Wealth : टॉप 10 श्रीमंत आमदारांमध्ये भाजपचे 5, शाह 3400 कोटींचे मालक, आव्हाडांची निव्वळ मालमत्ता 624 टक्क्यांनी घटली

काय आहेत पुस्तकात छगन भुजबळांचे दावे?

१. भाजपबरोबर सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद सर्वांना झाला. कारण अर्थातच ईडीपासून सुटका.

२. माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता.

३. मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या

४. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते

५. दोन-अडीच वर्षे तुरुंगात राहूनही ईडीची पुन्हा नोटीस आली. वयाच्या पंचाहत्तरीत कितीवेळा चौकशांना सामोरे जायचं.

६. तुरुंगात असताना भाजपात आलात तरच सुटका होईल, असं अनिल देशमुखही म्हणतात.

७. अजूनही तुरुंगातील दिवस आठवले की माझी झोप उडते

८. आता या वयातही ईडी माझा पिच्छा सोडायला तयार नाही.

९. पंतप्रधान मोदी वा भाजपबरोबर हातमिळवणी केल्याशिवाय सुटका नाही ही साऱ्यांचीच भावा होती.

१०. शरद पवारांना हे सारे समजत होते. पण ते भाजपबरोबर जाण्यास अनुकूल नव्हते.

११. भाजपबरोबर गेल्याने ईडीच्या जाचापासून साऱ्यांची सुटका झाली.

१२. कदाचित सुनेत्रा पवारांना अटक होऊ शकते, हे कळले तेव्हा अजितदादांनाही घाम फुटला होता.

अशा पद्धतीचे अनेक विधानं या पुस्तकात करण्यात आलेले आहेत. राष्ट्रवादी का फुटली? शरद पवारांचे असलेले निकटवर्तीय सहकारी एकत्र का आले? याची सर्व कारणं यात दिलेली आपल्याला पाहायला मिळेल.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.