Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नरेंद्र मोदी, अमित शहांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? शरद पवार यांचा वर्ध्यात सवाल

7

Sharad Pawar Rally: मोदी-शहांच्या राज्यात शेतकऱ्यांसाठी काय केले जात आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

महाराष्ट्र टाइम्स
Sharad Pawar fb.

म. टा. वृत्तसेवा, वर्धा : नापिकीच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी आमच्या सरकारने ७० हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली. आज शेतकरी संकटात सापडला आहे. कर्जाला कंटाळून आत्महत्या करीत आहे. बी-बियाणे, खते, औषधीच्या किमती वाढल्याने खर्च आणि नफ्याचा ताळमेळ बसत नाही. तरीही मोदी-शहांच्या राज्यात शेतकऱ्यांसाठी काय केले जात आहे, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.

हिंगणघाट येथील गोकुलधाम मैदानात महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल वांदिले यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी जाहीर सभा झाली. यात ते बोलत होते. व्यासपीठावर माजी गृहमंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे नेते सुरेश देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस (शप)चे प्रवक्ते नितेश कराळे, उमेदवार अतुल वांदिले यांची प्रमुख उपस्थिती होती.

पवार म्हणाले, मी कृषिमंत्री असताना शेतकरी आत्महत्यांची वार्ता येत होती. दिल्लीत असताना वर्ध्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची बातमी कळली. मी अस्वस्थ झालो. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे गेलो. त्यांना विदर्भात येण्यासाठी आग्रह धरला. नंतर अनेक सुधारणा दिसल्या. शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळावा म्हणूनही मी प्रयत्न केले. आज परिस्थिती विपरीत आहे. शेतमालाला उत्पादन खर्चही भरून निघेल इतका भाव मिळत नाही. कापूस-सोयाबीनचे भाव कोसळले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचे अनेक ठिकाणी कानी पडते आहे. देशाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे. आधी महाराष्ट्र देशात अव्वल स्थानी होता. आता सहाव्या क्रमांकावर घसरला आहे. हे थांबवायचे असेल तर ही निवडणूक महत्वाची असल्याचेही पवार म्हणाले.

नितेश कराळे यांनी तुफान फटकेबाजी करीत शरद पवार यांनी मनावर घेतले तर बिहार आणि आंध्र प्रदेशच्या जोरावर असलेले मोदी सरकार पडू शकते, असे वक्तव्य केले.
दाऊद अन् बिष्णोईचे टी-शर्ट विकणं पडलं महागात; ‘या’ ऑनलाइन विक्री करणाऱ्यांना वेबसाइट्सवर गुन्हा दाखल
भुजबळ ईडी-सीबीआयमुळे गेले : देशमुखराजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात छगन भुजबळ यांची मुलाखत छापून आली. यात त्यांनी ईडीच्या धाकाने भाजपमध्ये आपण गेलो. ईडी-सीबीआयची नोटीस आली तर या वयात आपण तुरुंगात जाऊ शकत नसल्याने सर्वांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची कबुली दिली असल्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. दोन वर्षांपासून राज्यातील सरकारने फोडाफोडीचे राजकारण सुरू केले आहे. महाराष्ट्रातील जनतेचे अनेक प्रश्न कायम आहेत. त्याकडे दुर्लक्ष होत आहे. सोयाबीन व कपाशीला भाव नाही. शेतकरी अडचणीत सापडला आहे. सरकारने कापसाच्या गाठी आयात केल्या, तेल आयात केल्याने हे घडले आहे. आमच्या सरकारच्या काळात कोणत्याही प्रकारची आयात झाली नाही. तशी काळजी महाविकास आघाडी सरकारने घेतली होती. आज सरकारने शेतमालावर जीएसटी लावला आहे. रासायनिक खतांचे भाव वाढले आहेत. एका बॅगवर हजार-बाराशे रुपयांपर्यंतची वाढ झाली आहे. विधानसभा निवडणुक आल्यामुळे तीन-चार महिन्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू केली, असा टोला देशमुख यांनी लगावला.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.