Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भरधाव बस चालकाचं नियंत्रण सुटलं, उभ्या ट्रकला जोरदार धडक; ८ जण गंभीर जखमी

8

Mumbai-Pune Highway Accident: या बसमध्ये एकूण ३८ प्रवासी होते. त्यातील ८ प्रवासी गंभीर जखमी झाले असून १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

हायलाइट्स:

  • पुणे-मुंबई लेनवरील नवीन बोगद्यामध्ये भीषण अपघात
  • खासगी बस आणि ट्रकमध्ये भीषण अपघात
  • आठ प्रवासी गंभीर जखमी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई पुणे महामार्ग अपघात

पुणे : आज सकाळी ५ वाजेच्या सुमारास मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुणे-मुंबई लेनवरील नवीन बोगद्यामध्ये भीषण अपघात झाला. ट्रक क्रमांक KA 56 5675 वरील चालक महेश भिम रेड्डी मुसाने (वय ३१, रा. गडीगोंडगाव ता.बसव, कल्याण जि. बिदर-कर्नाटक) याने त्याच्या ट्रकच्या ब्रेकची हवा उतरल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला लावला. तिसऱ्या लेनवर उभा केला असताना पाठीमागून येणारी बाळूमामा कंपनीची खासगी बस क्रमांक MH 03 DV 2412 वरील चालक बालाजी बळीराम सूर्यवंशी (वय ४१. वर्ष रा. खराबवाडी पो. वायगाव ता अहमदपूर जि.लातूर) याला अचानक ट्रक समोर दिसल्याने त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रकला मागून जोरदार धडक दिली. या बसमध्ये एकूण ३८ प्रवासी होते. त्यातील ८ प्रवासी गंभीर जखमी झाले असून १८ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातातील गंभीर आणि किरकोळ जखमी झालेल्या सर्व प्रवाशांना लोकमान्य हॉस्पिटलच्या स्वामिनी ॲम्बुलन्स सेवेच्या माध्यमातून एम.जी.एम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारार्थ रवाना केले आहे.
BJP Leader Murder: मोठी बातमी! भाजप नेत्याची हत्या, भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत संपवलं, सांगली हादरली

अपघातातील गंभीर जखमी प्रवासी

1) मनीषा भोसले
2) सुनिता तराळ
3) बालाजी बळीराम सूर्यवंशी (चालक)
4) संकेत सत्तपा घारे (सह चालक)
5)अभिजित दिंडे
6)सरिता शिंदे
7) संदीप मोगे
8) सोनाक्षी कांबळे

अपघातातील किरकोळ जखमी प्रवासी

1) सना बडसरिया
2) शिवांश
3) तनिष्का
4) हर्ष
5) अद्विका
6) गरिमा पाठक
7) प्राची
8) श्रेया
9) समीक्षा
10) साक्षी रेपे
11) मानसी लाड
12) जोहा अन्सारी
13) अमित शहा
14) दीक्षा
15) चेतन भोपळे
16) माही
17) शौर्य
18) आदिल

सदर अपघातातील बस आणि ट्रक ही दोन्ही वाहने आयआरबीकडील हायड्राच्या तथा पुलरच्या सहाय्याने बाजूला घेऊन तिन्ही लेनवरील वाहतूक सुरळीत चालू करण्यात आलेली आहे. सदर अपघातात बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना आयआरबी पेट्रोलिंग देवदूत यंत्रणा अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी बाहेर काढले. महामार्ग वाहतूक पोलीस केंद्र बोरघाट आणि खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी तातडीने पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदतकार्य केले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.